Saturday, March 07, 2026 02:23:51 AM

PM Kisan Scheme Installment: पीएम किसान यादी 2026 जाहीर! घरबसल्या मोबाईलवर एका क्लिकमध्ये तपासा तुमचे नाव

लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर स्टेटस आणि नाव यादीत तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

pm kisan scheme installment पीएम किसान यादी 2026 जाहीर घरबसल्या मोबाईलवर एका क्लिकमध्ये तपासा तुमचे नाव

नवी दिल्ली: यंदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) अंतर्गत मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेचा हा 22 वा हप्ता असून लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होळीपूर्वीच ही रक्कम वितरित होऊ शकते, त्यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

22 व्या हप्त्याची संभाव्य तारीख जवळ आल्याने लाभार्थी शेतकरी मागील हप्त्यांच्या नोंदीही तपासत आहेत. मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 वा हप्ता जारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर यंदाही निश्चित कालावधीतच हप्ता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीएम किसान योजनेबाबतची अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वर उपलब्ध आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी, कारण हप्त्याची रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे खात्यात जमा केली जाते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून (Ministry of Agriculture and Farmers Welfare) अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी विविध अहवालांनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात 2,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तू दुसरं लग्न केलंस ना, मग मी पण...’ मायलेकीत कडाक्याचं भांडण; आईने थेट गळाच आवळला, नेमकं काय घडलं?

शेतकरी पीएम किसान KYS (Know Your Status) तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतात. त्यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in संकेतस्थळ उघडावे. त्यानंतर ‘Farmer Corner’ विभागातील ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे. पुढे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून कॅप्चा भरावा आणि ‘Get OTP’ किंवा ‘Search’ पर्याय निवडावा. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर लाभार्थी स्थिती (Status) स्क्रीनवर दिसेल.

याच संकेतस्थळावरून पीएम किसान लाभार्थी यादी (Beneficiary List) देखील पाहता येते. शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून अल्प कालावधीतच शेतकऱ्यांच्या खात्यात लाखो कोटी रुपयांची मदत पोहोचवण्यात सरकारला यश मिळाले आहे. त्यामुळे 22 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेकडे आता देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी वितरित करण्यात आला होता. या टप्प्यात 9.35 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्यात आला होता. 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू झालेल्या या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत प्रत्येकी 2,000 रुपये थेट खात्यात जमा केली जाते.

हेही वाचा: Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो सावधान! उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर 'मेगाब्लॉक'चे संकट


सम्बन्धित सामग्री