Sunday, April 20, 2025 05:37:03 AM

14 वर्षे अनवाणी चालणाऱ्या 'या' व्यक्तीला पंतप्रधान मोदींनी घातले बूट; पहा व्हिडिओ

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर लिहिले की, 'यमुनानगरमधील आजच्या जाहीर सभेत मी कैथल येथील रामपाल कश्यपजींना भेटलो.

14 वर्षे अनवाणी चालणाऱ्या या व्यक्तीला पंतप्रधान मोदींनी घातले बूट पहा व्हिडिओ
PM Modi fulfilled Rampal Kashyap’s 14-year vow
Edited Image, X

PM Modi Fulfilled Rampal Kashyap’s 14-year Vow: पंतप्रधान मोदी आज हरियाणा दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी हिसार आणि यमुनानगरमध्ये विविध कार्यक्रमांना संबोधित केले. मोदींच्या या दौऱ्यात एक मनोरंजक घटना घडली. या घटनेची माहिती देणारा व्हिडिओ स्वतः पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे. या घटनेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मी हरियाणातील यमुनानगरमध्ये रामपाल कश्यपला भेटलो. रामपाल कश्यप यांनी 14 वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि त्यांना ते प्रत्यक्ष भेटत नाहीत तोपर्यंत ते बूट किंवा चप्पल घालणार नाहीत. अशा परिस्थितीत, आज पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर रामपाल कश्यप यांनी बूट घातले.'

हेही वाचा -  प्रियांका गांधींना मिळू शकते नवी जबाबदारी! पक्षाचे उपाध्यक्ष पद देण्याबाबत चर्चा सुरू

पंतप्रधान मोदींनी घेतली रामपाल कश्यप यांची भेट - 

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर लिहिले की, 'यमुनानगरमधील आजच्या जाहीर सभेत मी कैथल येथील रामपाल कश्यपजींना भेटलो. त्यांनी 14 वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की मी पंतप्रधान झाल्यानंतरच ते बूट घालतील. मी रामपालजींसारख्या लोकांना नमन करतो आणि त्यांचा स्नेह देखील स्वीकारतो, परंतु अशा शपथ घेणाऱ्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो, तुमच्या प्रेमाची मी कदर करतो, कृपया सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीशी संबंधित अशा काही कामावर लक्ष केंद्रित करा!'

हेही वाचा - आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान हरियाणाला भेट देणार; विविध विकासकामांचे उद्घाटन करणार

पंतप्रधान मोदींनी शेअर केला रामपाल कश्यप यांचा व्हिडिओ - 

पंतप्रधान मोदींनी रामपाल कश्यप यांचा व्हिडिओही एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रामपाल कश्यप अनवाणी पायांनी पंतप्रधान मोदींना भेटायला जातात. यावर पंतप्रधान मोदींनी प्रथम विचारले, 'अरे भाऊ, तू हे का केलेस?' रामपाल कश्यप यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या प्रतिज्ञाबद्दल सांगितले की, त्यांनी बूट घालण्याची प्रतिज्ञा केली होती. यानंतर, पंतप्रधान मोदींनी रामपाल कश्यपला बसवले आणि त्याला बूट घालायला देऊन ते म्हणाले, 'आज मी तुला बूट घालायला लावत आहे, पण पुन्हा कधीही असे करू नका. तुम्ही काम करायला हवे, असे करून तुम्ही स्वतःला का त्रास देत आहात? यापुढे आता तुम्ही अनवाणी राहू नका, असंही मोदींनी रामपाल कश्यप यांना म्हटलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री