PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत निवासस्थान 7 लोककल्याण मार्ग येथे शुक्रवारी कदंबाचे रोप लावले. हे रोप ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिले होते. 17 सप्टेंबर रोजी आपल्या 75 व्या वाढदिवशी राजा चार्ल्स यांनी ही खास भेट पंतप्रधान मोदींना पाठवली होती.
कदंबाचे हे रोप भारत-यूके यांच्यातील दृढ मैत्री आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या एकत्रित बांधिलकीचे प्रतीक मानले जात आहे. या भेटीमागे पंतप्रधान मोदींच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची प्रेरणा आहे. या मोहिमेत नागरिकांना आपल्या मातांच्या सन्मानार्थ एक झाड लावण्याचे आवाहन केले जाते.
हेही वाचा: LPG Gas Cylinder: जीएसटी दर कमी झाल्याने गृहपयोगी वस्तूंच्या किमतीत घट,मात्र एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होणार का?
ब्रिटिश उच्चायोगाने सामाजिक माध्यमावर याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमामुळे दोन देश पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र काम करत असल्याचे अधोरेखित होते. तसेच, यापूर्वी जुलै महिन्यात ब्रिटन दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राजा चार्ल्स यांना ‘सोनोंमा’ झाड भेट दिले होते, याची आठवणही करून देण्यात आली.
भारत सरकारच्या निवेदनानुसार, या उपक्रमाचे दोन उद्देश आहेत. मातांचा त्याग व संगोपनाचे सन्मानपूर्वक स्मरण करणे आणि पर्यावरण संवर्धनास चालना देणे. झाडे जीवनाचा पाया मानली जातात. ती पोषण, संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा देतात.
हेही वाचा: Online Games New Rules : सरकारची मोठी कारवाई; 1 ऑक्टोबरपासून पैशांच्या ऑनलाइन गेम्सवर गंडांतर
पंतप्रधान मोदी यांच्या या उपक्रमातून प्रेरणा घेवून प्रत्येक नागरिकाला आपल्या आईच्या नावाने झाड लावून स्मृती निर्माण करण्याची संधी मिळेल. त्यामुळे समाजात निसर्गरक्षणाची जाणीव ही वाढेल आणि पुढील पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाचा पाया रचला जावू शकेल.