Wednesday, June 18, 2025 03:49:50 PM

ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींनी घेतल्या 45 गुप्त बैठका

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 45 गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींनी घेतल्या 45 गुप्त बैठका

दिल्ली: 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 45 गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पाकड्यांना प्रत्युत्तर देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच घेतला होता. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एनएसए, सीडीएस, लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक केली होती, अशी माहिती सध्या समोर येत आहे.

भारताची ताकद जगाने केली मान्य:

7 ते 10 मे पर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी तणाव होता. यादरम्यान, पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांसोबतच भारताने त्यांच्या दहशतवादी अड्ड्यांना देखील नष्ट केले. तसेच, या काळात पाकड्यांनी नेहमीप्रमाणे खोट्या प्रचाराच्या युक्तांचा वापर केला. त्यांनी अनेक खोटे दावे देखील केले होते. जेव्हा भारताने हल्ल्यांचे ठोस पुरावे जगासमोर सादर करण्यास सुरुवात केली, तेव्हा जगाने मान्य केले की भारताने नवीन काळातील युद्धात यश मिळवले आहे.

पाकड्यांची कबुली:

भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर रहीम यार खान एअरबेसवर पाकिस्तानला मोठे नुकसान झाले. पाकिस्तानला स्वतःहून हे नुकसान कबूल करावे लागले. यादरम्यान, भारताने पाकड्यांचे अनेक महत्वाच्या एअरबेसला लक्ष्य केले होते. तसेच, उपग्रह चित्रांमधूनही नुकसान झाल्याचे दिसत आहे. भारतीय लष्करांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सरगोधा एअरबेसवर भारताने रनवेच्या दोन भागांवर अचूक शस्त्रांचा वापर करून हल्ला केला होता.


सम्बन्धित सामग्री