Tuesday, November 18, 2025 02:46:25 AM

Rahul Gandhi Swimming Video : बिहारच्या तळ्यात राहुल गांधींची जलक्रीडा! 'डुबवू नका' म्हणत युजर्सच्या कमेंटस्, राजकीय चर्चांना उधाण

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहारमध्ये अचानक एका तळ्यात उतरून पोहताना दिसले. हा केवळ एक पब्लिक स्टंट आहे की निवडणूक प्रसिद्धीची नवीन युक्ती, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

rahul gandhi swimming video  बिहारच्या तळ्यात राहुल गांधींची जलक्रीडा डुबवू नका म्हणत युजर्सच्या कमेंटस् राजकीय चर्चांना उधाण

Rahul Gandhi Swimming Video : सध्या प्रसिद्धीसाठी आणि राजकीय प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. आता चक्क काँग्रेस नेते राहुल गांधींचा तळ्यात पोहत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. राहुल बिहारमध्ये निवडणूकपूर्व प्रचारासाठी गेले असताना त्यांनी इथल्या तळ्यात पोहण्याचा आनंद घेतला. सोशल मीडियाच्या महासागरात लगेचच  ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामुळे राजकीय आणि सार्वजनिक प्रतिमेच्या जगात मोठी खळबळ माजली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अचानक एका तळ्यात (Pond) उतरून पोहत (Swimming) असताना दिसले. समर्थक आणि कॅमेरामन यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी ही 'जलक्रीडा' केली. पाण्यातच उभे राहून त्यांनी चाहत्यांसोबत फोटोही काढले.

काही क्षणातच ही क्लिप व्हायरल झाली आणि युजर्सकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. हा केवळ एक पब्लिक स्टंट आहे की निवडणूक प्रसिद्धीची नवीन युक्ती, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा - Priyanka Gandhi: प्रियांका गांधींचा संताप , म्हणाल्या “दरवर्षी दिल्लीकरांना विषारी हवेत जगावं लागतं”

तळ्यात उतरून राहुल गांधींनी केली जलक्रीडा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, राहुल गांधी तळ्याच्या काठावर उपस्थित लोकांशी संवाद साधल्यानंतर अचानक पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत अनेक समर्थक आणि काही स्थानिक लोकही तळ्यात उपस्थित होते. जवळ उभे असलेले फोटोग्राफर आणि मोबाईल कॅमेरे सतत शूटिंग करत होते. फुटेजमध्ये राहुल गांधींची सक्रियता आणि सहजता लगेच लक्ष वेधून घेते आणि याच सहजतेमुळे दर्शकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

टीकाकार म्हणाले 'दिखाऊपणा', तर समर्थकांनी सांगितले 'जुळलेले नाते'
काही लोक या कृतीला मच्छीमारांसोबत राहुल गांधींचे 'जुळलेले नाते' म्हणून पाहत आहेत, तर टीकाकार याला 'दिखाऊ आणि लक्ष वेधून घेणारा प्रकार' असे म्हणत आहेत. हा व्हिडिओ केवळ एका 'स्विमिंग मोमेंट'पुरता मर्यादित न राहता, तो राजकीय प्रतिमा-निर्मिती, मीडिया व्यवस्थापन आणि सार्वजनिक दृष्टिकोनावर नवीन चर्चेची ठिणगी बनला आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव
@_Sweet_Parul_ नावाच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत तो लाखों लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत:
एका युजरने म्हटले, "तुम्ही तर पोहून बाहेर आलात, पण आम्हाला डुबवू नका."
दुसऱ्या एका युजरने लिहिले, "राहुल गांधी या वयातही खूप उत्साही (Energetic) आहेत."
तर एका तिसऱ्या युजरने म्हटले, "14 नोव्हेंबरला कळेल कोण पोहून बाहेर निघतो आणि कोणाची नाव बुडते."
एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, सोशल मीडियाच्या युगात कोणतीही प्रतिमा किंवा क्लिप मिनिटांत राजकीय चर्चेचे केंद्र बनू शकते.

हेही वाचा - Name of Delhi Be Changed? : राजधानी 'दिल्ली'चे 'असे' नामकरण करावे; भाजप खासदाराने अमित शाहांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?


सम्बन्धित सामग्री