Thursday, July 17, 2025 03:21:54 AM

राजा रघुवंशी यांची चौथ्या प्रयत्नात करण्यात आली हत्या; मेघालय पोलिसांचा धक्कादायक खुलासा

राजा रघुवंशी यांची हत्या एकदा किंवा दोनदा नव्हे तर चौथ्या प्रयत्नात करण्यात आल्याचा खुलासा आता पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडामागे राजाची पत्नी सोनमचं मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले आहे.

राजा रघुवंशी यांची चौथ्या प्रयत्नात करण्यात आली हत्या मेघालय पोलिसांचा धक्कादायक खुलासा
Raja Raghuvanshi Murder
Edited Image

Raja Raghuvanshi Murder Case: सध्या देशभरात राजा रघुवंशी हत्याकांडची चर्चा सुरू आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिस सातत्याने मोठे खुलासे करत आहेत. राजा रघुवंशी यांची हत्या एकदा किंवा दोनदा नव्हे तर चौथ्या प्रयत्नात करण्यात आल्याचा खुलासा आता पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडामागे राजाची पत्नी सोनमचं मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले आहे. राजा रघुवंशी यांची हत्या हा एक सुनियोजित कट होता. पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सीम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पहिला प्रयत्न गुवाहाटीमध्ये करण्यात आला होता, परंतु तो अयशस्वी झाला.

यानंतर, चेरापुंजीमध्ये राजा रघुवंशी यांच्या हत्येचे दोन प्रयत्न करण्यात आले. यातील पहिला प्रयत्न नोंगरियातमध्ये करण्यात आला. मात्र, येथे मृतदेह लपवण्यासाठी जागा सापडली नाही. तसेच दुसऱ्यांदा मावलाखियात आणि वेसावडोंग दरम्यान राजाची हत्या करण्यात प्रयत्न करण्यात आला. परंतु, येथे सोनमचा कट पूर्ण होऊ शकला नाही. शेवटी वेसावडोंग परिसरात राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली.

राजा आणि सोनम यांचे लग्न होऊन जेमतेम दोन आठवडे झाले होते. ते त्यांच्या हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. तेव्हा ते दोघेही बेपत्ता झाले. तथापि, 2 जून रोजी राजाचा मृतदेह धबधब्याजवळील खोल दरीत सापडला. शोध घेतल्यानंतर, सोनम 9 जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये दिसली आणि तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

हेही वाचा - कोल्हापुरातील एका लॉजवर 40 वर्षीय प्रियकराने केला प्रेयसीचा खून

दरम्यान, तपासात असे दिसून आले आहे की, लग्नापूर्वीचं सोनमने हा कट रचला होता. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत हत्येची योजना आखली होती. राज आणि सोनमने या कामात आणखी तीन जणांना सामील केले होते. यात आकाश ठाकूर, आनंद कुर्मी आणि विशाल चौहान यांचा समावेश होता. 

हेही वाचा - पोलिस 'हे' 10 प्रश्न विचारून करणार राजा रघुवंशीच्या हत्येचा उलगडा

सर्व आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली - 

तथापि, सोनम आणि सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. एसपी विवेक सीम यांच्या मते, सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोनमने स्वतः तिचा सहभाग कबूल केला आहे. तपासात असेही उघड झाले आहे की लग्नाच्या तीन महिने आधी फेब्रुवारीमध्ये हत्येची योजना सुरू झाली होती.


सम्बन्धित सामग्री