Asaram Bapu Bail: लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बुधवारी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
वैद्यकीय उपचारांसाठी अर्ज दाखल
जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसारामने आपल्या आरोग्य स्थितीचा हवाला देत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सध्या तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांना वयाशी संबंधित अनेक आजार, तसेच दोन वेळा हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - Nilesh Ghaiwal: लंडनमध्ये घायवळचा मिळाला ठाव ठिकाणा; पोलिसांकडून घायवळला भारतात परत आणण्याची मोहीम
अंतरिम जामीनाच्या अटी
न्यायालयाने आसारामला 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. जामिनाच्या काळात तो पुराव्यावर प्रभाव पाडू शकणार नाही. त्याला त्याच्या अनुयायांशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. जामीनाचा कालावधी संपल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात हजर राहावे लागेल.
हेही वाचा - Lawrence Bishnoi Gang: कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून व्यावसायिकाचा खून तर एका पंजाबी गायकाच्या घरीही गोळीबार
बलात्कार प्रकरणातील शिक्षा
2013 मध्ये 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आसाराम दोषी ठरला होता. पीडित मुलगी आसारामच्या अनुयायांची मुलगी होती. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली आणि 2018 मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय, गुजरातमधील सुरत येथे दोन बहिणींवर अत्याचार केल्याच्या आरोपांवरून आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावरही आणखी एक गुन्हा दाखल आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्येही सर्वोच्च न्यायालयाने आसारामला मार्च अखेरपर्यंत अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. त्या वेळीही त्याच अटी लागू करण्यात आल्या होत्या.