लखनऊ: Rajasthan Royals ने Lucknow Super Giants ला 40 धावांनी पराभूत करत महत्त्वाचा विजय मिळवला. इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संपूर्ण संघ 119 धावांवर गारद झाला.
लखनऊकडून मिचेल मार्श याने एकहाती झुंज देत 41 चेंडूंमध्ये 55 धावांची लढाऊ खेळी केली. मात्र दुसऱ्या टोकाला साथ न मिळाल्याने त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. ऋषभ पंत, निकोलस पूरन आणि मयंक यादव यांसारखे महत्त्वाचे खेळाडू अपयशी ठरले. लखनऊचा हा 7 सामन्यांतील पाचवा पराभव ठरला.
राजस्थान रॉयल्ससाठी हा हंगामातील पाचवा विजय ठरला असून सलग दोन पराभवानंतर संघाने दमदार पुनरागमन केले आहे. कमी धावसंख्या असूनही राजस्थानने सामना त्यांच्या बाजूने वळवला.
हेही वाचा: Middle East War Effect: आखाती युद्धाचा मोठा परिणाम! आधी एलपीजी आता 'डाएट कोक', चक्क बाजारातून कॅनच गायब
राजस्थानच्या डावात रवींद्र जडेजा याने 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला 159 धावांपर्यंत नेले. इकाना स्टेडियमची पिच नेहमीच गोलंदाजांना साथ देणारी असल्याने ही धावसंख्या पुरेशी ठरली.
लखनऊची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 11 धावांवरच संघाने तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. एडन मार्करम आणि आयुष बदोनी यांना खातेही उघडता आले नाही. निकोलस पूरनने 22 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
राजस्थानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत लखनऊच्या फलंदाजीला रोखले. जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर आणि बृजेश शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर रवी बिश्नोई यानेही 1 विकेट घेत संघाच्या विजयात योगदान दिले.
हेही वाचा: Road Accident: ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् समोर आलेल्या 4 गाड्यांना उडवलं, 11 जणांचा जिवंत होरपळून करुण अंत