Tuesday, November 18, 2025 03:28:00 AM

Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; 4 पैकी 3 जागांवर नॅशनल कॉन्फरन्सचा विजय

नॅशनल कॉन्फरन्सने चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला. तर एका जागी भाजपला कमळ फुलवता आल. भाजपचे सतपाल शर्मा विजयी झाले.

jammu kashmir  जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर 4 पैकी 3 जागांवर नॅशनल कॉन्फरन्सचा विजय

Jammu Kashmir Rajya Sabha Election Result: जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. नॅशनल कॉन्फरन्सने चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला. तर एका जागी भाजपला कमळ फुलवता आल. भाजपचे सतपाल शर्मा विजयी झाले. नॅशनल कॉन्फरन्सचे चौधरी मोहम्मद रमजान, जी.एस. ओबेरॉय उर्फ ​​शम्मी ओबेरॉय आणि सज्जाद किचलू विजयी झाले. सज्जाद यांना 57 मते मिळाली. चौधरी मोहम्मद रमजान यांची भाजपच्या अली मोहम्मद मीर यांच्याशी थेट लढत होती. सज्जाद किचलू यांचा सामना भाजपच्या राकेश महाजन यांच्याशी झाला. शम्मी ओबेरॉय हे राज्यसभेवर निवडून येणारे जम्मू आणि काश्मीरमधील पहिले शीख नेते असतील. राज्यसभेच्या निवडणुकीत चार क्रॉस-व्होटिंग झाले. 

इतिहासातील पहिली निवडणूक - 

दरम्यान, 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द झाल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात विभागणी झाल्यानंतर ही पहिली राज्यसभा निवडणूक आहे. चार जागांसाठी तीन अधिसूचना जारी करून निवडणुका घेतल्या गेल्या, यापैकी दोन स्वतंत्रपणे आणि दोन एकाच अधिसूचनेनुसार होत्या.

हेही वाचा - INS Mahe Commissioned: कोचीन शिपयार्डकडून भारतीय नौदलाला अत्याधुनिक युद्धनौका ‘आयएनएस माहे’ हस्तांतरीत

एनसी-पीडीपीचा पाठिंबा 
तथापी, गुरुवारी, 23 ऑक्टोबरला नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने त्यांच्या आमदारांना सत्ताधारी उमेदवारांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी केला. काँग्रेस आणि पीडीपी यांनीही एनसीला पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा - SEBI Mutual Fund Reforms: सेबीचा मोठा निर्णय ; गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठे बदल

विधानसभेतील जागा - 
जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण 88 आमदार आहेत. त्यापैकी एनसी आणि पीडीपीच्या आघाडीला 57 आमदारांचा आधार आहे. भाजपकडे 28 आमदार असून, त्यांनी तिसऱ्या अधिसूचनेत सतपाल शर्मा यांना धोरणात्मक नामांकन केले.


सम्बन्धित सामग्री