नवी दिल्ली: तुमच्या नेतृत्वात १४० कोटी भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम आणि भारतीय संस्कृतीच्या प्रति प्रेम आणि समर्पण भावना वाढली आहे. तुम्ही क्रूर मुघलांच्या नावाने बांधलेल्या औरंगजेब रोडचे नाव डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोड असे ठेवले. इंडिया गेटवरील पंचम जॉर्ज यांचा पुतळा हटवून त्याजागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात आला. राजपथाचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यात आले. तसेच इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार असे करण्यात यावे.
इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करा
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं पंतप्रधान मोदींना पत्र
हे नामकरण भारतातील शहीदांना योग्य श्रद्धांजली असेल असं पत्रात म्हटलंय. भारतीय जनता पक्षातील अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत ही मागणी केली. त्यांनी इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करा असे पत्रामध्ये म्हटले आहे. हे नामकरण भारतातील शहीदांना योग्य श्रद्धांजली असेल असा मजकूर पत्रात आहे.
जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रामध्ये लिहिलेल्या मजकुरामध्ये "आपण औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्याचे नाव ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड असे ठेवले. इंडिया गेटवरील किंग जॉर्ज पंचमची मूर्ती हटवून त्याजागी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारला. राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ असे नाव दिले. याच प्रकारे इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करावे अशी मी विनंती करतो," असे नमूद केले आहे.