Monday, March 09, 2026 08:51:45 AM

SP leader Died : भीषण अपघात! धावत्या कारवर कोसळला 1,000 किलोचा अवाढव्य विजेचा खांब; सपा नेत्याचा दुर्दैवी मृत्यू

येथील पेट्रोल पंपासमोर कर्मचारी एक अजस्त्र 'हाय मास्ट' विजेचा खांब बसवण्याचे काम करत होते. हा खांब सुमारे 1,000 किलो वजनाचा होता. हाच खांब कोसळल्याने अपघात घडला.

sp leader died  भीषण अपघात धावत्या कारवर कोसळला 1000 किलोचा अवाढव्य विजेचा खांब सपा नेत्याचा दुर्दैवी मृत्यू

1000 Killo Lighting Pole Fell : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. भररस्त्यात चालत्या गाडीवर विजेचा अवजड खांब कोसळल्याने समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते लाल बहादूर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या पश्चात पत्नी आणि 5 मुले (त्यात 4 मुली) असा परिवार आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार म्हणूनही कार्यरत होते. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे, असा आरोप होत आहे.

भररस्त्यात 'हाय मास्ट' पोलचा कोसळला काळ
ही घटना 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1:00 वाजेच्या सुमारास अंतू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुगंज बाजार परिसरात घडली. येथील पेट्रोल पंपासमोर कर्मचारी एक अजस्त्र 'हाय मास्ट' विजेचा खांब बसवण्याचे काम करत होते. हा खांब सुमारे 1,000 किलो वजनाचा होता. खांब बसवण्याचे काम सुरू असताना अचानक कर्मचाऱ्यांचा तोल गेला आणि हा अवजड पोल थेट रस्त्यावरून जाणाऱ्या हुंदाई क्रेटा (Hyundai Creta) गाडीवर कोसळला. या जोरदार अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आणि गाडी चालवणारे लाल बहादूर यादव यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - Youngest Organ Donor: दुःखाच्या महासागरात मानवतेचा दीप; केरळच्या सर्वात लहान अवयवदात्याची ही कथा वाचून डोळे पाणावतील

स्थानिकांची धाव आणि कुटुंबीयांचा आक्रोश; निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि यादव यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लाल बहादूर यादव हे समाजवादी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांनी दोनदा पंचायत निवडणूकही लढवली होती. या घटनेनंतर मृताचे काका शंकर लाल यादव यांनी प्रशासकीय कामावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "हाय मास्ट लाईट बसवणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पुतण्याचा बळी गेला," असा आरोप त्यांनी केला. इतक्या मोठ्या वजनाचा खांब बसवत असताना परिसरात लोकांच्या आणि वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालणे आवश्यक होते, मात्र कोणतीही सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे हा अनर्थ ओढवला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

पोलीस तपासाची सद्यस्थिती
अंतू पोलीस स्टेशनचे अधिकारी अभिषेक सिरोही यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. समाजवादी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अब्दुल कादिर जिलानी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसली, तरी या भीषण दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - JJ Hospital Doctor Strike : मुंबईची आरोग्य व्यवस्था कोलमडणार? विविध मागण्यांसाठी आजपासून जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू


सम्बन्धित सामग्री