Encounter In Manipur: मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी युनायटेड कुकी नॅशनल आर्मी (UKNA) या बंदी घातलेल्या संघटनेच्या चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. हेंगलेप उपविभागातील खानपी गावाजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास ही चकमक झाली.
सुरक्षा यंत्रणांना अतिरेक्यांच्या हालचालीबाबत विशिष्ट गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सकाळी सर्च ऑपरेशन सुरू केलं. या दरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला आणि प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी कारवाई केली. यात UKNA गटातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा -DGCA New Policy: फ्लाइट तिकीट रद्दीकरण आता होणार अधिक सोपं; DGCA चा ‘लुक-इन ऑप्शन’ प्रस्ताव चर्चेत
UKNA म्हणजे कोण?
युनायटेड कुकी नॅशनल आर्मी हा कुकी-झोमी समुदायाशी संबंधित सशस्त्र गट असून, त्यांनी केंद्र सरकार आणि मणिपूर प्रशासनाशी झालेल्या सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SoO) करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे या गटाविरोधात सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत.
हेही वाचा - Gem Jwellery Policy : 'कस्टम्स अॅक्ट आणि SEZ कायद्यात सुधारणा करा'; 'जेम अँड ज्वेलरी' संघटनेची केंद्राकडे मागणी
परिसरात तणाव; मात्र परिस्थिती नियंत्रणात
चकमकीनंतर परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं आहे. संभाव्य अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या तणावपूर्ण असली तरी पूर्णपणे नियंत्रणात आहे.