Sunday, February 09, 2025 04:46:27 PM

SME IPO of EMA Partners Company
मुंबईतील इएमए पार्टनर्स कंपनीचा SME आयपीओ, गुंतवणूकदारांना मोठी संधी

मुंबईतील इएमए पार्टनर्स कंपनीचा sme आयपीओ गुंतवणूकदारांना मोठी संधी

भारतीय शेअर बाजारात 2024 मध्ये आयपीओच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. आता मुंबईतील इएमए पार्टनर्स इंडिया कंपनीचा एसएमई आयपीओ येत्या काही दिवसांत एनएसई इमर्ज या प्लॅटफॉर्मवर लिस्ट होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी हा मोठ्या कमाईचा सुवर्णसंधी ठरू शकतो.

इएमए पार्टनर्स इंडिया कंपनीने 76 कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. हा आयपीओ 17 जानेवारी 2025 रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. आयपीओचा किंमतपट्टा प्रति शेअर 117-124 रुपये ठेवण्यात आला आहे. एका लॉटमध्ये 1000 शेअर्सचा समावेश असेल.

आयपीओची वैशिष्ट्ये:

उभारणीचे उद्दिष्ट: 76 कोटी रुपये
लिस्टिंग प्लॅटफॉर्म: एनएसई इमर्ज
किंमतपट्टा: ₹117-₹124 प्रति शेअर
बोलीसाठी खुली तारीख: 17 जानेवारी 2025
अँकर इन्वेस्टर्ससाठी बोली तारीख: 16 जानेवारी 2025
प्रमोटर्सचे शेअर विक्री: 7.96 लाख शेअर्स
इएमए पार्टनर्स कंपनी आयपीओच्या माध्यमातून 66.14 कोटी रुपयांचे 53.34 लाख इक्विटी शेअर्स जारी करेल, तर प्रमोटर्सकडून 7.96 लाख शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील. सध्या प्रमोटर्सकडे कंपनीचे 86.14% शेअर्स असून पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 13.86% शेअर्स आहेत.


शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. या लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

(टीप: वाचकांनी माहितीवर आधारित गुंतवणूक निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करावा.)

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री