Friday, November 14, 2025 05:29:14 PM

भारत-बांगलादेश सीमेवर तस्करांचा BSF जवानांवर हल्ला; एक जवान जखमी

या कारवाईदरम्यान दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून 10 किलो गांजा, 100 बाटल्या फेन्सेडिल आणि एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

भारत-बांगलादेश सीमेवर तस्करांचा bsf जवानांवर हल्ला एक जवान जखमी
Edited Image

कोलकाता: पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात पुन्हा एकदा बांगलादेशी तस्करांनी बीएसएफ साउथ बंगाल फ्रंटियरच्या सतर्क जवानांवर हल्ला केला. बीएसएफच्या 143 व्या बटालियनच्या सीमा चौकी ताराली-1 वर तैनात असलेल्या सतर्क आणि धाडसी जवानांनी या हल्ल्याला धैर्याने तोंड दिले. कठीण परिस्थितीतही जवानांनी अत्यंत संयम बाळगत स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला आणि तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईदरम्यान दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून 10 किलो गांजा, 100 बाटल्या फेन्सेडिल आणि एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. 

हेही वाचा -गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची हत्या; वडिलांनीचं झाडल्या मुलीवर गोळ्या

हा हल्ला दुपारी 1:50 वाजता करण्यात आला. चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या जवानाने पाहिले की 3 ते 4 संशयास्पद व्यक्ती बॅकलोड घेऊन आंतरराष्ट्रीय सीमेकडे जात आहेत. कर्तव्यावर असलेल्या जवानाने ताबडतोब सतर्कता दाखवली आणि त्याच्या सहकाऱ्याला सावध केले. जवानाने त्यांना थांबण्याचे आव्हान केले. परंतु, ते थांबले नाहीत. यावेळी तस्करांनी जवानांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून जवानाने पीएजीकडून हवेत इशारा देणारा गोळीबार केला. त्यानंतर तस्कर अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी जवानाच्या अगदी जवळ येऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

हेही वाचा वडोदरा पूल दुर्घटनेतील 15 मृतदेह सापडले, बचावकार्य अजूनही सुरू

2 तस्करांना अटक - 

दरम्यान, तस्करांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान जखमी झाला. अंधाराचा आणि जवळच्या घरांचा फायदा घेत तस्करांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क जवानांनी पाठलाग करून दोन संशयित तस्करांना पकडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि तस्करीचा माल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या तस्करांना अधिक चौकशी करण्यात येत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री