Raja Raghuvanshi Murder Case: शनिवारी शिलाँगच्या जिल्हा सत्र न्यायालयाने राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांना 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतरही त्यांची मुदत वाढवून मागितली नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. सहाय्यक सरकारी वकील तुषार चंदा यांनी सांगितले की, 'दोन्ही आरोपींना 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची कोणतीही मागणी केली नाही.'
दरम्यान, राजा रघुवंशी हत्याकांडात एक नवीन आणि धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, जे सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांच्या कटाची क्रूरता दर्शवते. हे फुटेज 4 जूनचे असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी राजा रघुवंशीचा मृतदेह शिलाँगहून इंदूरला आणण्यात आला होता. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, राजाच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी मुख्य आरोपी राज कुशवाहा सोनमचे वडील देवी सिंह यांच्यासोबत राजाच्या घरी पोहोचला होता. त्याच्या उपस्थितीने आणि भूमिकेने पोलिस तपासात नवा ट्विस्ट आला.
हेही वाचा - राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा खुलासा! सोनमसमोरचं 2 शस्त्रांचा वापर करून करण्यात आली राजाची हत्या
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, राज कुशवाहाच्या हातात राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्कारासाठी एक कफन होते, जे त्याने राजाच्या कुटुंबाला दिले. परंतु त्यानंतर लगेचच सर्वात धक्कादायक दृश्य येते, राज कफन देताच त्याला त्याच्या फोनवर कॉल येतो. त्यानंतर तो गर्दीतून निघून जातो आणि एकांतात कोणाशी तरी बोलू लागतो.
हेही वाचा - Sanam Bewafa: सोनम रघुवंशी प्रकरणाचा 'सनम बेवफा'शी काय संबंध? सोशल मीडियावर ट्रोलचा भडिमार
तथाीप, पोलिसांना संशय आहे की हा कॉल दुसऱ्या कोणाचा नसून सोनम रघुवंशीचा होता. यावेळी सोनम इंदूरमध्ये लपून बसली होती. असा संशय आहे की सोनम अंत्यसंस्काराच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होती. तसेच ती राजकडून मिनिटा-मिनिटाचे अपडेट घेत होती.