Stampede At Vijay's Rally: तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात शनिवारी विजय यांच्या प्रचार रॅलीत चेंगराचेंगरी झाली. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. या घटनेमुळे रॅलीदरम्यान विजय यांचे भाषण तात्पुरते थांबवावे लागले, कारण गर्दीत अनेक उपस्थित बेशुद्ध झाले. घटनास्थळी द्रमुकचे माजी मंत्री सेंथिल बालाजी आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
भीषण गर्दीमुळे अने उपस्थित लोक बेशुद्ध पडल्याचे समोर आले. विजय यांनी भाषण थांबवून शांततेचे आवाहन केले आणि आपत्कालीन रुग्णवाहिका तातडीने उपस्थित करून गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या आणि वैद्यकीय पथके तातडीने तैनात करण्यात आली.
हेही वाचा - Who is IFS Petel Gehlot : कोण आहेत पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणाऱ्या पेटल गेहलोत?; 'गिटार डिप्लोमॅट' म्हणूनही आहे ओळख
दरम्यान, अनेक जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनादरम्यान, एका नऊ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली, ज्यामुळे विजयला पोलिसांकडून मदत मागावी लागली. तथापी, विजय यांनी कार्यकर्त्यांना मुलीच्या शोधात मदत करण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा - Amit Shah On Rahul Gandhi: घुसखोरांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून मतदान यात्रा काढली; अमित शाहांची राहुल गांधींवर टीका
घटनास्थळी विजय यांनी भाषणादरम्यान माजी द्रमुक मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. भाषणादरम्यान विजय यांनी पुढील सहा महिन्यांत तामिळनाडूमध्ये राजकीय सत्ता बदल होईल असा दावा केला. ही रॅली 2026 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयच्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेचा भाग होती. घटनेनंतर अधिकारी आणि आयोजकांनी गोंधळ नियंत्रणात आणून कार्यक्रम सुरळीतपणे संपविला.