Sunday, February 09, 2025 06:17:36 PM

Stampede in Prayagraj
मौनी अमावस्येची ती रात्र.. 'त्या' दिवशी तेच अन् आजही तेच

प्रयागराजमधून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी झाली असून 10 जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो लोक जखमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.

मौनी अमावस्येची ती रात्र त्या  दिवशी तेच अन् आजही तेच

प्रयागराज: उत्तर प्रदेश सद्या दुमदुमून निघालाय. याच कारण म्हणजे महाकुंभमेळा. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सद्या महाकुंभमेळा सुरु आहे. अनेक भाविक त्याचबरोबर देश विदेशातील बहुसंख्य पर्यटक महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये दाखल झालेत. परंतु आता प्रयागराजमधून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी झाली असून 10 जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो लोक जखमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. यामुळे सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द करण्यात आलाय. तर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलंय. त्रिवेणी संगमाजवळ स्नानाच्या जागी  ही  घटना घडली असल्याची माहिती आहे. यामुळे आता  मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्यात आलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

धक्कादायक म्हणजे 1954 च्या कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्याच दिवशी चेंगराचेंगरी झाली होती आणि आता पुन्हा 2025 मध्ये देखील मौनी अमावस्येच्या दिवशीच ही चेंगराचेंगरीची घटना घडली. 1954 कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी ही भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात 3 फेब्रुवारी 1954 रोजी झालेली मोठी गर्दी होती. ही घटना घडली तेव्हा मौनी अमावस्या चा मुख्य स्नानाचा दिवस होता.

या संपूर्ण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत त्यांच्याकडून घटनेचा आढावा घेतलाय. मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ मेळ्यामध्ये गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी म्हणून अनेकांनीच संगमाच्या दिशेनं धाव घेतली. यादरम्यान पोल क्रमांक 90 ते 118 मध्ये एकच गोंधळ माजला तिथं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. प्रथमदर्शींच्या माहितीनुसार बॅरिकेड उघडल्यानंतर एकाएकी लोकांचा लोंढा नियंत्रणाबाहेर गेला आणि इथं चेंगराचेंगरी झाली, आरडाओरडा, किंकाळ्या आणि भीतीच्या वातावरणात ही परिस्थिती आणखी जास्त चिघळली. 

गर्दीचा एकंदर आढावा घेत परिस्थितीचं गांभीर्य ओळखत अखेर आखाड्यांच्या वतीनं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आखाडा परिषदेचे महामंत्री हरि गिरी यांच्या माहितीनुसार अनिश्चित काळासाठी हे अमृत स्नान रद्द करत भाविकांच्या हितार्थ हा निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर आता इथं बचावकार्याला वेग आला असून, जखमी किंवा मृतांचा अधिकृत आकडा मात्र समोर येऊ शकलेला नाही. 
 
 


सम्बन्धित सामग्री