नवी दिल्ली : कौशल्य विकास आणि वंचित समुदायांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज कौशल्य भवन येथे सोलर कम्युनिटी हब मोबाईल व्हॅन प्रशिक्षण युनिट्सना हिरवा झेंडा दाखवला. हा परिवर्तनकारी उपक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC), लर्निंग लिंक्स फाउंडेशन, डेल टेक्नॉलॉजीज आणि स्थानिक भागधारकांचा एकत्रित प्रयत्न आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कार्यक्रमादरम्यान बोलताना जयंत चौधरी म्हणाले की हे सौरऊर्जेवर चालणारे मोबाईल प्रशिक्षण युनिट्स शिक्षण आणि संधी थेट त्यांच्या दाराशी पोहोचवून वंचित समुदायांना सक्षम बनवण्यासाठी एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन दर्शवतात. डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेवर लक्ष केंद्रित करून उदयोन्मुख तंत्रज्ञानासह हा उपक्रम कौशल्य विषयक तफावत भरून काढतो आणि समावेशक वाढीला चालना देतो. क्यूएस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे याचा सार्थ अभिमान बाळगत त्यांनी सांगितले की ही कामगिरी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित तंत्रज्ञानासारख्या परिवर्तनकारी क्षेत्रात आपल्या देशाच्या नेतृत्व क्षमतेवर प्रकाश टाकते. डेल टेक्नॉलॉजीज लक्ष्यित समुदायापर्यन्त पोहोच निर्माण करून धोरणात्मक भागीदारी आणि आवश्यक डिजिटल संसाधने आणि संबंधित कार्यक्रमांमध्ये प्रवेश प्रदान करून 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम करण्याच्या जागतिक ध्येयासाठी वचनबद्ध आहे. एकत्रितपणे आम्ही कुशल आणि डिजिटलरित्या समावेशक भारतासाठी मार्ग तयार करत आहोत असेही ते म्हणाले.
हेही वाचा : एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार
सोलर कम्युनिटी हब्स हे सौर ऊर्जेवर चालणारे अत्याधुनिक मोबाईल ट्रेनिंग युनिट्स आहेत. जे वंचित समुदायांना प्रभावी कौशल्य समाधान देण्यासाठी डिझाइन/तयार केलेले आहेत. या कार्यक्रमातून या केंद्रांची देशभरात सुरुवात झाली आहे. यामध्ये सात व्हॅन सिक्कीम, आंध्र प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कार्यरत असतील.आर्थिक वर्ष 2025 मध्ये हा कार्यक्रम सात नवीन जिल्ह्यांमध्ये विस्तारित केला जाईल आणि त्याचा परिणाम 5.8 दशलक्ष अतिरिक्त लाभार्थ्यांवर होण्याची अपेक्षा आहे. लाभार्थ्यांमध्ये तरुण, विद्यार्थी, महिला आणि माजी सैनिक यांचा समावेश आहे.
लॅपटॉप, पोर्टेबल फर्निचर, जीपीएस सिस्टीम, एमआयफाय राउटर, पॅनिक बटणे आणि ब्लूटूथ-सक्षम स्पीकर यासारख्या प्रगत सुविधांनी सुसज्ज, हे केंद्र डिजिटल आणि आर्थिक साक्षरता, तांत्रिक कौशल्य, सायबर सुरक्षा आणि जनरेटिव्ह एआयचा परिचय यासह विविध विषयांवर प्रशिक्षण देतात. सहयोगी प्रयत्नातून विकसित केलेला हा कार्यक्रम स्किल इंडिया मिशनच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचे एकत्रीकरण करून, हा उपक्रम डिजिटल समावेशनाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी डेल टेक्नॉलॉजीची वचनबद्धता दर्शवतो.