मुख्यमंत्री विजय खऱ्या आयुष्यात एका वेगळ्याच भूमिकेत; बस ‘कंडक्टर’ बनून स्वतः तिकिटे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल

वाहतूक खर्च हा महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री ए. विजय तमिळन पार्थिबन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री विजय खऱ्या आयुष्यात एका वेगळ्याच भूमिकेत; बस ‘कंडक्टर’ बनून स्वतः तिकिटे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल
CM Joseph Vijay

Tamil Nadu CM Vijay Bus Conductor Video: तमिळनाडू राज्याची सूत्रे हाती घेतल्यापासून एकामागून एक मोठे निर्णय घेणारे मुख्यमंत्री जोसेफ विजय हे शुक्रवारी एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी चेन्नईमध्ये थेट बसने प्रवास करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधला आणि स्वतः बस कंडक्टरची भूमिका वठवत महिलांना मोफत तिकिटे वाटली. यादरम्यान बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना चॉकलेट्स दिले, ज्यामुळे प्रवासात अत्यंत हलका-फुलका आणि आनंदी क्षण पाहायला मिळाला.

‘वेत्री पयनम थिट्टम’ योजनेच्या विस्ताराचा शुभारंभ
मुख्यमंत्री विजय यांनी ‘वेत्री पयनम थिट्टम’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या विस्ताराचा अधिकृत शुभारंभ करण्यासाठी हा बस प्रवास केला होता. या योजनेअंतर्गत तमिळनाडूतील महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, योजनेच्या या नव्या विस्तारामध्ये एक्सप्रेस श्रेणीतील बसेसचाही समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘ऑपरेशन गंगाजल’चा धडाका; भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या दोन आयएएस अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

84 लाख महिलांना मिळणार दररोज मोफत प्रवासाचा लाभ
तमिळनाडू सरकारच्या या विस्तारित योजनेमुळे दररोज तब्बल 84.32 लाख महिलांना मोफत प्रवासाचा थेट लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सुविधेसाठी राज्यभरात महामंडळाच्या एकूण 12,695 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही आर्थिक किंवा उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली नाही; तसेच लाभार्थी एका दिवसात कितीही वेळा या मोफत प्रवासाचा आनंद घेऊ शकतात, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

शिक्षण, रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार
वाहतूक खर्च हा महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री ए. विजय तमिळन पार्थिबन यांनी सांगितले. शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा आणि उपजीविकेच्या साधनांपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी ही मोफत प्रवास सुविधा मोलाची भूमिका बजावेल. मुख्यमंत्र्यांच्या या अनोख्या उपक्रमाचा आणि प्रवाशांना तिकीट वाटतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘मी प्रचंड धक्क्यात होते, काय करावं सुचत नव्हतं…’; फ्लाईदुबईचे कॅप्टन मच्छार यांच्या पत्नीने सांगितला कठीण प्रसंगाचा अनुभव

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number