Monday, July 14, 2025 05:40:37 AM

पंजाब सरकारचा मोठा निर्णय! सर्व शाळांमध्ये पंजाबी विषय शिकवणे अनिवार्य

पंजाब सरकारने राज्यातील सर्व शाळांना पंजाबी विषय अनिवार्य केला आहे.

पंजाब सरकारचा मोठा निर्णय सर्व शाळांमध्ये पंजाबी विषय शिकवणे अनिवार्य
Punjabi Subject Mandatory In All Schools at Punjab
Edited Image

Punjabi Subject Mandatory In All Schools: पंजाब सरकारने राज्यातील सर्व शाळांना पंजाबी हा मुख्य आणि अनिवार्य विषय म्हणून शिकवणे अनिवार्य केले आहे. तत्पूर्वी, पंजाब सरकारने बुधवारी म्हटलं होतं की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या नवीन मसुद्याच्या नियमावलीत पंजाबी विषय विषय यादीतून काढून टाकला आहे. तर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही यादी सूचक असून कोणताही विषय काढून टाकला जाणार नाही. 

हेही वाचा - CBSE 10 वी बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार; कोणते बदल होणार? जाणून घ्या

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मसुद्याच्या नियमांमध्ये इतर 13 भाषांचा उल्लेख नाही आणि त्यांचे अध्यापन सुरूच राहील. इतर 13 भाषांमध्ये रशियन, नेपाळी, लिंबू, लेप्चा, सिंधी, मल्याळम, ओडिया, आसामी, कन्नड, कोकबोरोक, तेलुगू, अरबी आणि पर्शियन यांचा समावेश आहे.

सीबीएसईने मंगळवारी दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या मसुद्याच्या नियमांना मान्यता दिली. मसुदा नियम आता सार्वजनिक केले जातील आणि भागधारक 9 मार्चपर्यंत त्यांचे अभिप्राय देऊ शकतील, त्यानंतर धोरण अंतिम केले जाईल. पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांनी आरोप केला की, नवीन धोरणातील विषयांच्या यादीतून पंजाबी भाषा वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांनी दावा केला की, त्यांचे सरकार भाषेवरील कोणताही हल्ला सहन करणार नाही.

हेही वाचा - RRB Railway Loco Pilot Result 2025: रेल्वे लोको पायलट परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा रिझल्ट

तेलंगणामध्ये तेलुगू विषय अनिवार्य - 

यापूर्वी तेलंगणामध्ये आता तेलुगू हा अनिवार्य विषय म्हणून शिकवला जाणार असल्याचं तेथील शिक्षण विभागाने सांगितले होते. तेलंगणा सरकारने राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि इतर बोर्डांशी संलग्न शाळांमध्ये तेलगू हा सक्तीचा विषय म्हणून लागू करण्याचा आदेश जारी केला होता. 
 


सम्बन्धित सामग्री