रियाध: भारतातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ सध्या जगातील विविध देशांच्या दौऱ्यावर आहे. जागतिक व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक धोरणांचा आणि त्यांच्या नापाक कारवायांचा पर्दाफाश करणे हा त्यांचा उद्देश आहे. या मोहिमेचे नेतृत्व विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी केले आहे, जे भारताची एकता आणि जागतिक सुरक्षेप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी सौदी अरेबियाची राजधानी रियाधला पोहोचले तेव्हा त्यांनी पाकिस्तानवर तीव्र हल्ला चढवला.
रियाधमध्ये माध्यमांना संबोधित करताना असदुद्दीन ओवैसी यांनी थेट पाकिस्तानवर निशाणा साधला. पाकिस्तान मुस्लिम जगाला आणि अरब देशांना चुकीचा संदेश देत आहे की ते एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारतात मुस्लिमांसाठी कोणतेही स्थान नाही. हे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की, भारत 24 कोटी अभिमानी भारतीय मुस्लिमांचे घर आहे, जे देशाच्या समृद्ध संस्कृती, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेत पूर्ण सहभागी आहेत. भारतातील मुस्लिम समुदाय केवळ सुरक्षित नाही तर राष्ट्र उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
हिंदू-मुस्लिम दंगली घडवणे हे दहशतवाद्यांचे उद्दिष्ट -
दरम्यान, ओवेसी यांनी पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान आपल्या पोषित दहशतवाद्यांद्वारे भारतात जातीय तणाव आणि हिंदू-मुस्लिम दंगली पसरवू इच्छित आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना भारताला अस्थिर करण्याची रणनीती आखत आहेत. या दहशतवादी गटांना पाकिस्तानमध्ये आश्रय मिळत नाही, तर त्यांना भारतात दहशतवादी कारवाया पसरवण्यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहे.
हेही वाचा -मोठा खुलासा! असीम मुनीरचं होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाइंड?
पाकिस्तानच्या दहशतवाद-पुरस्कृत धोरणांवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा पर्दाफाश होत नाही, तोपर्यंत दहशतवादाचे हे जाळे नष्ट करणे कठीण होईल. तथापि, फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) चा संदर्भ देत ओवेसी म्हणाले की, पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये पुन्हा टाकावे जेणेकरून त्याच्यावर जागतिक आर्थिक निर्बंध लादले जातील आणि तो दहशतवादाला निधी देऊ शकणार नाही.
हेही वाचा - Earthquake in Pakistan: पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला! 'इतकी' होती तीव्रता
पाकिस्ताचे दहशतवाद्यांना पाठबळ -
पाकिस्तान दहशतवाद्यांना पैसा, शस्त्रे आणि आश्रय देण्यात आघाडीची भूमिका बजावत आहे. जर त्याच्यावर आर्थिक दबाव आणला गेला नाही तर तो अशा कारवाया थांबवणार नाही. दरम्यान, ओवेसी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यावरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, जेव्हा असीम मुनीर यांना पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल बनवण्यात आले, त्याच वेळी अमेरिकेने मोहम्मद एहसान नावाच्या दहशतवादीला पकडले, जो थेट पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनांशी जोडलेला होता. पाकिस्तानचे लष्करी नेतृत्व स्वतः दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळून येते, तरी आंतरराष्ट्रीय समुदाय गप्प का आहे? असा सवालही यावेळी ओवैसी यांनी उपस्थित केला.