Sunday, February 08, 2026 06:18:01 AM

Census 2027: देशाच्या पहिल्या 'डिजिटल जनगणने'साठी प्रशासन सज्ज; 'या' 33 प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाला 33 प्रश्न विचारले जाणार असून, त्याची सविस्तर यादी आता समोर आली आहे.

census 2027 देशाच्या पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी प्रशासन सज्ज या 33 प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे

Census 2027 : तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशात जनगणनेच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी गुरुवारी (22 जानेवारी 2026) एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली. यानुसार, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाला 33 प्रश्न विचारले जाणार असून, त्याची सविस्तर यादी आता समोर आली आहे.

1 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला प्रारंभ

कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेली ही जनगणना आता 'डिजिटल' स्वरूपात होणार आहे. जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पडेल. सुमारे 30 लाख कर्मचाऱ्यांमार्फत ही महामोहीम राबवली जाणार असून सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवली जाईल.

हेही वाचा - Income Tax Exemption Limit : 15 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त? अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकराविषयी मध्यमवर्गीयांच्या 'या' अपेक्षा पूर्ण होणार का?

सरकार विचारणार 'हे' 33 प्रश्न 
जनगणनेसाठी येणारे कर्मचारी खालील मुद्द्यांवर माहिती गोळा करतील:

घराची रचना आणि स्थिती:

इमारत व घर क्रमांक.
घराची स्थिती आणि घरासाठी वापरलेले साहित्य (फरशी, भिंती, छत).
घराचा वापर (निवासी की अन्य).

कुटुंबाची माहिती:

कुटुंब क्रमांक आणि सदस्यांची एकूण संख्या.
कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग आणि सामाजिक प्रवर्ग (SC/ST/इतर).
कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या.
घराची मालकी (स्वतःचे की भाड्याचे) आणि खोल्यांची संख्या.

मूलभूत सुविधा आणि इंधन:

पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आणि त्याची उपलब्धता.
वीजेचा स्रोत आणि शौचालयाचा प्रकार/उपलब्धता.
सांडपाणी निचरा यंत्रणा आणि स्नानगृहाची सोय.
स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी (LPG/PNG) कनेक्शनची माहिती.

डिजिटल आणि भौतिक मालमत्ता:

रेडिओ, टीव्ही, इंटरनेट आणि लॅपटॉप/संगणकाची उपलब्धता.
टेलिफोन, मोबाईल किंवा स्मार्टफोन.
सायकल, टू-व्हीलर (स्कूटर/मोपेड) किंवा फोर-व्हीलर (कार/जीप).

इतर महत्त्वाचे:

कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य.
केवळ अधिकृत संवादासाठी मोबाईल क्रमांक. 

प्रश्नावलीत दोन नव्या प्रश्नांची भर

दरम्यान, 2011 च्या जनगणनेच्या तुलनेत यंदाची प्रश्नावली अधिक व्यापक आहे. 2020 मध्ये 31 प्रश्नांची यादी तयार होती, मात्र आता त्यात दोन प्रश्न वाढवून ती 33 वर नेण्यात आली आहे. यामध्ये घरबांधणीच्या साहित्यापासून ते तुमच्या हातातील स्मार्टफोनपर्यंतच्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा घेतला जाईल.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या