उत्तरप्रदेश : प्रेम आंधळ असतं म्हणतात ते खरं आहे. प्रेमात बुडालेल्या लोकांना काही कळत नाही असेही म्हटले जाते. त्याचीच प्रचिती उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या घटनेमुळे आली आहे. चक्क एका आजीनेच 30 वर्षांच्या प्रियकरासोबत प्रेम केल्याची घटना घडली. एक आजी 30 वर्षीय प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला आणि बदनामीच्या भीतीने कुटुंबाने पोलिसात याबद्दल तक्रार केली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सदर घटना उत्तरप्रदेशातील कानपूरच्या बजारिया भागामध्ये घडली आहे. ही महिला 50 ते 55 वर्षाची आहे आणि ती 30 वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. विशेष म्हणजे ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली आहे. आमची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही या घटनेची कुठेही वातचता केली नसल्याचे महिलेच्या मुलाने सांगितले आहे.
हेही वाचा : निमगावकरांनी काढली वानराची अंत्ययात्रा; वाचून व्हाल आश्चर्यचकित
कुटुंबातील महिला प्रियकरासोबत पळून गेल्याने सदर कुटुंबाला समाजात तोंड लपवून वावरावे लागत आहे. त्यामुळे या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांनाही दिली नाही असे कुटुंबाने सांगितले. हा विषय सध्या कानपूरमध्ये चर्चेत आहे. कुटुंबियांनी या घटनेची तक्रार कुठेही केली नाही. पोलिसात तक्रार झाली तर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा : सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहात तर सावधान...