Monday, February 09, 2026 01:26:17 PM

Anant Ambani Watch : अंबानींच्या 'वंतारा'ची जादू आता मनगटावर! 13.7 कोटींच्या घड्याळात साक्षात अवतरलं जंगल; काय आहेत खास वैशिष्ट्ये ?

रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी आणि त्यांच्या 'वंतारा' या ड्रीम प्रोजेक्टला समर्पित असलेले 'ऑपेरा वंतारा ग्रीन कॅमो' हे विशेष घड्याळ 21 जानेवारी 2026 रोजी लाँच करण्यात आले.

anant ambani watch  अंबानींच्या वंताराची जादू आता मनगटावर 137 कोटींच्या घड्याळात साक्षात अवतरलं जंगल काय आहेत खास वैशिष्ट्ये

Anant Ambani Watch :  जगातील दिग्गज लक्झरी ब्रँड 'जेकब अँड कंपनी'ने (Jacob & Co) कारागिरीचा एक अद्भूत नमुना पेश केला आहे. रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी आणि त्यांच्या 'वंतारा' या ड्रीम प्रोजेक्टला समर्पित असलेले 'ऑपेरा वंतारा ग्रीन कॅमो' हे विशेष घड्याळ 21 जानेवारी 2026 रोजी लाँच करण्यात आले. सुमारे 13.7 कोटी (1.5 दशलक्ष डॉलर) किंमत असलेल्या या घड्याळाने सध्या लक्झरी मार्केटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

डायलवर अनंत अंबानींसह वाघ-सिंहाची 3D शिल्पे

या घड्याळाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा 'डायल'. यामध्ये केवळ वेळ दिसत नाही, तर एक जिवंत कलाकृती पाहायला मिळते. डायलच्या मध्यभागी निळ्या फ्लोरल शर्टमधील अनंत अंबानींचे हाताने रंगवलेले एक सुबक 3D शिल्प साकारण्यात आले आहे. या शिल्पाच्या बाजूला जंगलाचा राजा सिंह आणि बंगाल वाघ यांची अतिशय सूक्ष्म लघुशिल्पे कोरलेली आहेत. हे संपूर्ण डिझाइन गुजरातच्या 'वंतारा' वन्यजीव केंद्राची आठवण करून देते.

हेही वाचा - Wireless Electricity: अद्भुत क्रांती! WiFi प्रमाणे आता मिळणार वीज, 'या' देशातील शास्त्रज्ञांचा मोठा शोध

400 रत्नांची झळाळी आणि सोन्याचा साज

हे घड्याळ तयार करण्यासाठी कंपनीने कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. यामध्ये वापरलेली सामग्री आणि दागिने याची यादी थक्क करणारी आहे. घड्याळाच्या बाह्य रचनेत सुमारे 400 मौल्यवान रत्ने जडवण्यात आली असून, त्याचे एकूण वजन 21.98 कॅरेट आहे. या घड्याळाची बॉडी 'व्हाईट गोल्ड'पासून बनवलेली असून, त्याला अधिक राजेशाही लूक देण्यासाठी मगरीच्या चामड्याचा (Crocodile Leather) पट्टा जोडला आहे. संपूर्ण घड्याळावर हिरव्या रंगाचा 'कॅमफ्लाज' पॅटर्न आहे, जो निसर्ग आणि जंगलाच्या थीमला साजेसा ठरतो.

 

कथा सांगणारी कारागिरी

दरम्यान, 'जेकब अँड कंपनी' केवळ घड्याळ बनवत नाही, तर त्यातून एक कथा मांडते. अनंत अंबानी यांनी जखमी प्राण्यांच्या संरक्षणासाठी उभारलेल्या 'वंतारा' प्रकल्पाला दिलेली ही एक अनोखी मानवंदना आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी याच कंपनीने 'राम जन्मभूमी' आवृत्तीचे घड्याळ तयार केले होते, जे अनंत अंबानी आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे पाहायला मिळाले होते. 
 


सम्बन्धित सामग्री