नवी दिल्ली: बीएसएनएल वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांची क्वांटम 5 जी सेवा सॉफ्ट लाँच केली आहे. बीएसएनएल लवकरच देशातील अनेक निवडक शहरांमध्ये त्यांची 5जी सेवा सुरू करणार आहे. वापरकर्त्यांच्या सूचनेवरून कंपनीने त्यांच्या 5जी सेवेचे नाव क्यू-5जी म्हणजेच क्वांटम 5जी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएलने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की 5जी सेवा सॉफ्ट लाँच करण्यात आली असून ती अद्याप व्यावसायिकरित्या सुरू झालेली नाही.
हेही वाचा - एलोन मस्कच्या SpaceX Starship रॉकेटचा चाचणीदरम्यान स्फोट
BSNL ची हैदराबादमध्ये क्वांटम 5जी सेवा सुरू -
बीएसएनएल इंडियाने त्यांच्या एक्स हँडलद्वारे सांगितले की कंपनीचे सीएमडी ए रॉबर्ट जे रवी यांनी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये क्वांटम 5जी एफडब्ल्यूए सेवा सुरू केली आहे. लवकरच, ती देशातील इतर निवडक शहरांमध्ये सुरू केली जाईल. या सेवेद्वारे, वापरकर्त्यांना सुपरफास्ट 5जी इंटरनेट अॅक्सेस मिळेल. वापरकर्ते बीएसएनएल क्यू-5जी एफडब्ल्यूएद्वारे जलद इंटरनेट अॅक्सेस करू शकतील.
हेही वाचा - 15 ऑगस्टपासून बदलणार फास्टॅगसंदर्भातील नियम! वर्षाच्या पाससाठी लागणार 'इतके' पैसे
दरम्यान, BSNL ने देशात आपले नेटवर्क सुधारण्यासाठी 1 लाख नवीन 4G/5G मोबाइल टॉवर्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित आहे. तथापी, कंपनीने 1 लाख नवीन टॉवर्स बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी आणखी 1 लाख टॉवर्स बसवण्यात येणार आहेत.