Tuesday, November 11, 2025 07:46:30 PM

New Rules In October 2025: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' 7 नियम; जनतेच्या खिशावर होणार थेट परिणाम

महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी नियम आणि धोरणांमध्ये सुधारणा केल्या जात असल्या तरी, या महिन्यात बदलांचा फटका प्रत्येक घराला बसणार आहे.

new rules in october 2025 1 ऑक्टोबरपासून बदलणार हे 7 नियम जनतेच्या खिशावर होणार थेट परिणाम

New Rules In October 2025: देशभरात 1 ऑक्टोबर 2025 पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि डिजिटल बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम जनतेवर होईल. महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी नियम आणि धोरणांमध्ये सुधारणा केल्या जात असल्या तरी, या महिन्यात बदलांचा फटका प्रत्येक घराला बसणार आहे. ऑनलाइन गेमिंग, रेल्वे तिकीट बुकिंग, यूपीआय व्यवहार, EPF, LPG आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.

1. ऑनलाइन गेमिंगमध्ये बदल 

सरकारने ऑनलाइन गेमिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. खेळाडूंना फसवणूक आणि अनैतिक व्यवहारापासून संरक्षण देणे, तसेच कंपन्यांवर कडक देखरेख सुनिश्चित करणे या नियमांचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मान्यता दिली आहे.

2. रेल्वे तिकीट बुकिंग 

ऑक्टोबरपासून ऑनलाइन आरक्षणाच्या पहिल्या 15 मिनिटांसाठी फक्त अशा प्रवाशांनाच तिकीट बुकिंगची सुविधा मिळेल, ज्यांचे आयआरसीटीसी खाते आधारशी संलग्न आणि प्रमाणित असेल. हे नियम दलाल आणि एजंटांच्या मनमानी कारभारावर आळा घालतील.

3. यूपीआय व्यवहार  

UPI वर 'कलेक्ट रिक्वेस्ट' किंवा 'पुल ट्रान्झॅक्शन' वैशिष्ट्य बंद केले जाईल. त्यामुळे फोनपे, Google Pay किंवा इतर अॅप्सद्वारे थेट पैसे मागणे शक्य राहणार नाही. एनपीसीआयने हा बदल ऑनलाइन फसवणूक आणि फिशिंग रोखण्यासाठी केला आहे.

4. EPF सुविधा 

EPFO 10-11 ऑक्टोबरमध्ये खातेधारकांना थेट एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे. तसेच, पेन्शन 1,000 वरून 1,500–2,500 पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये EPFO नवीन डिजिटल सेवा 'EPFO 3.0 सुरू करू शकते.

हेही वाचा PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! किसान सन्मान निधीचा हप्ता वाटप सुरू; 3 राज्यांतील 27 लाख लाभार्थ्यांना दिवाळी भेट

5. LPG किंमत 

1 ऑक्टोबरपासून LPG सिलिंडरच्या किमती बदलण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात सिलिंजरचा दर 1631 रुपयांवरून कमी होऊन 1580 रुपये झाला होता. मात्र, नुकताच जीएसटी दर कमी झाल्यानंतरही गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या नव्हत्या हे ही विसरून चालणार नाही. 

6. NPS सुधारणा 

राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू केला जाईल. या सुधारणेमुळे गैर-सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन क्रमांकाचा वापर करून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील.

हेही वाचा - Latest Gold Silver Prices : सोनं घसरलं, चांदी विक्रमी उंचीवर; जाणून घ्या आजचे दर

7. एकाच पॅनसह गुंतवणूक 

पूर्वी फक्त एक योजना निवडण्याची परवानगी होती. आता गुंतवणूकदार त्यांची जोखीम क्षमता आणि गरजेनुसार विविध योजनांमध्ये पर्याय निवडू शकतील. सुरक्षित गुंतवणूकदार संतुलित किंवा कर्ज योजना निवडू शकतात, तर उच्च परतावा इच्छिणारे 100 टक्के इक्विटी-आधारित योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

या बदलांमुळे ऑनलाइन व्यवहार, सार्वजनिक सुविधा आणि आर्थिक नियोजनावर मोठा प्रभाव जाणवेल. त्यामुळे जनतेने आपले व्यवहार नियोजित करणे आवश्यक आहे.
 


सम्बन्धित सामग्री