उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्हाला आशियाई सिंहांना किंवा बंगाल वाघाला पाहण्याची इच्छा असेल किंवा प्राण्यांच्या दृश्यांमध्ये रमायचे असेल तर आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी यायला पाहिजे. चला तर जाणून घेऊया.
1 - गिर राष्ट्रीय उद्यान, गुजरात:
गिर राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण भारतातील सर्वात जुन्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. येथे तुम्हाला एशियाटिक सिंह म्हणजेच गुजराती सिंह, वाघ आणि त्यासोबतच इतर प्राण्यांना जवळून पाहायला मिळेल. हे ठिकाण जुनागढ पासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. बातमीनुसार, गिर राष्ट्रीय उद्यानमध्ये सध्या 523 सिंह आहेत. यामध्ये, 109 नर, 201 मादी आणि उर्वरित 213 तरुण सिंह आणि त्यांची पिल्ले आहेत. डिसेंबर ते मार्च या काळात गीर राष्ट्रीय उद्यान भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
2 - रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान:
हे ठिकाण उत्तर भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. सवाई माधोपूरपासून 11 किलोमीटर अंतरावर रणथंभोर राष्ट्रीय उद्यान आहे. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हे रॉयल बंगाल टायगरसाठी विशेष ओळखले जाते. हे उद्यान दहा झोनने बनलेले आहे जिथे प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळे वाघ आणि त्यांची संतती पाहायला मिळते.
3 - कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश:
कान्हा राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण रुडयार्ड किपलिंग यांच्या जंगल बुकमागील प्रेरणास्थान होते. कान्हा राष्ट्रीय उद्यान बारासिंघा (swamp deer) साठी विशेष ओळखले जाते. या उद्यानात वाघ, बिबट्या, आळशी अस्वल यासारखे प्राणी आणि नीलगाय यासारख्या विविध प्रजातींचे पक्षी देखील पाहायला मिळते.
4 - जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड:
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वांत पहिले राष्ट्रीय उद्यान आणि सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प म्हणून ओळखले जाते. लेखक आणि संशोधक जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ हे उद्यान ओळखले जाते. हे उद्यान पाच झोनने बनलेले आहे: झिरणा, बिजरणी, ढिकाला, दुर्गादेवी आणि सीतावाणी. या झोनमध्ये रॉयल बंगाल वाघ, बिबट्या, हॉग डिअर, ओटर, चित्तल, जंगली मांजर, स्लॉथ बेअर्स, बार्किंग डिअर आणि इतर प्राणी पाहायला मिळतात.