World's Most Polluted City: दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिल्लीची हवा विषारी बनली आहे. फटाक्यांचा धूर, वाहनांचे उत्सर्जन, बांधकाम धूळ आणि पराली जाळण्यामुळे राजधानीत श्वास घेणंही अवघड झालं आहे. स्विस एअर क्वालिटी मॉनिटरिंग फर्म ‘IQAir’ च्या नव्या अहवालानुसार, दिल्ली सध्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनली आहे.
भारतातील तीन शहरे टॉप 10 मध्ये
IQAir च्या ‘रिअल टाइम एअर क्वालिटी’ यादीत भारतातील मुंबई पाचव्या आणि कोलकाता आठव्या क्रमांकावर आहेत. तर, पाकिस्तानातील लाहोर आणि कराची यांचाही या यादीत समावेश आहे.
हेही वाचा - Fire at Building Near Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनाजवळील इमारतीला आग! अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
जगातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरे (AQI नुसार):
दिल्ली (भारत)
लाहोर (पाकिस्तान)
कुवैत शहर (कुवेत)
कराची (पाकिस्तान)
मुंबई (भारत)
ताश्कंद (उझबेकिस्तान)
दोहा (कतार)
कोलकाता (भारत)
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया)
जकार्ता (इंडोनेशिया)
दिल्लीचा AQI ‘अत्यंत वाईट’ स्तरावर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी दिल्लीचा AQI 350 च्या पुढे गेला, जो “अत्यंत वाईट” श्रेणीत येतो. बवाना, जहांगीरपुरी, वजीरपूर, अलीपूर आणि बुरारी क्रॉसिंगसारख्या भागांमध्ये AQI 401 च्याही पुढे नोंदवला गेला.
हेही वाचा - PM Modi : 'स्वदेशी, स्वच्छता, आरोग्य आणि प्रत्येक भाषेचा आदर..' पंतप्रधान मोदींचं दिवाळीनिमित्त देशवासियांना खास पत्र; म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर..'
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन
दिवाळीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फक्त हिरवे फटाके मर्यादित वेळेत फोडण्याची परवानगी दिली होती. मात्र, अनेक भागांत नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवले, ज्यामुळे हवेची गुणवत्ता झपाट्याने ढासळली आणि शहरावर घनदाट धुराचं आवरण पसरलं. तज्ञांच्या मते, जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर दिल्लीमध्ये श्वसनासंबंधी आजार आणि ऍलर्जीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.