पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यातच एका फोनने सर्वांना हादरवून ठेवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी पोलिसांना मिळाली. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन करत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे सांगितले त्यानंतर पोलिसांकडून तात्काळ सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देत तपास सुरू कऱण्यात आला होता.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला होता.
हेही वाचा: 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा जप्त
त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास करत चेंबूर परिसरातून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आलीय.संशयीत आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. आणि त्यातच दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याआधी विमानावर हल्ला करणार असल्याची धमकी आल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली.
पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचं प्रकरण गांभिर्याने घेत पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सीला माहिती देत तपास सुरू केला. मुंबई पोलिसांनी याबाबत सांगितले की, ज्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन केला तो धमकीचा होता. त्याला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. तो व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे समजतेय.