लखनौ: अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ई-मेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. यामध्ये राम मंदिराच्या सुरक्षेला आव्हान देण्यात आले आहे. ट्रस्टने अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मंदिर परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तथापि, या प्रकरणात ट्रस्ट किंवा कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत ईमेल आयडीवर एक धमकीचा मेल पाठवण्यात आला. यामध्ये मंदिराच्या सुरक्षेला आव्हान दिले जात असून ते धोक्यात आणले जात आहे, असे म्हटले होते. यानंतर, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. त्यानंतर मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली.
हेही वाचा - ''गाडी बॉम्बनं उडवणार, घरात घुसून मारणार''; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
तामिळनाडूहून पाठवण्यात आला धमकीचा मेल -
दरम्यान, पोलिस आजूबाजूच्या परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवून आहेत. हा मेल तामिळनाडूहून पाठवण्यात आला आहे. अयोध्येपासून तामिळनाडूपर्यंत सर्व सायबर गुन्हे तज्ञांना सक्रिय करण्यात आले आहे. अयोध्या जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, राम मंदिर ट्रस्टला एक संशयास्पद ईमेल मिळाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईमेलमध्ये, राम मंदिराच्या सुरक्षेला धोका असल्याबद्दल ट्रस्टला इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - शिंदेंच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी; दोन जण ताब्यात
तथापि, पोलिसांनी यासंदर्भात माध्यमांना फारशी माहिती दिलेली नाही. रविवारी रात्री हा ईमेल मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत राम मंदिर ट्रस्ट किंवा सुरक्षा एजन्सींकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. याआधीही राम मंदिराचे नुकसान करण्याच्या धमक्या अनेक वेळा देण्यात आल्या आहेत. खलिस्तानी दहशतवादी पन्नूने राम मंदिरावर बॉम्बस्फोट करण्याची धमकीही दिली होती. बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी मकसूद अन्सारी यानेही यापूर्वी आरडीएक्सने मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती.