नवी दिल्ली : ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेत टीकेची झोड उठली आहे. दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानं ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं दिसतंय अशा मथळ्याखाली न्यूयॉर्क टाईम्सनं ट्रम्प यांना लक्ष्य केलं. तसंच द्विपक्षीय पद्धतीनेच तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही असल्याचं म्हणत न्यूयॉर्क टाईम्सनं भारताच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.
ट्रम्प यांच्या युद्ध विरामाच्या घोषणेनंतर भारताने तीव्र नाराजी दर्शवली असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. तसेच भारताने पाकिस्तानच्या आण्विक अस्त्र भांडारावर मारा केला. आण्विक अस्त्र भांडारावर मारा केल्याने अमेरिकेची मध्यस्थी केली असेही न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.
हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही चकमक सुरूच; जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार
ट्रम्प यांच्या संदर्भातील टीका नेमकी काय?
भारताने पाकिस्तानच्या अण्विक शस्त्र भांडारावर मारा केला. भारताने आण्विक शस्त्र भांडारावर लक्ष्य केल्याने ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. परंतु ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारत नाराज आहे. ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्यानेच त्यांनी हस्तक्षेप केला. पाकिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची एकच भूमिका असल्याची टीका न्यूयॉर्क टाईम्सने केली आहे.
न्यूयॉर्क टाईम्सचे ट्रम्प यांच्यावर ताशेरे
न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकन वृत्तपत्राने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. भारत- पाकिस्तान युद्धविरामाच्या निर्णयामुळे न्यूयॉर्क टाईम्सने ट्रम्प यांना लक्ष केले आहे. भारताकडून पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र भांडारावर मारा करण्यात आला. भारताकडून आण्विक शस्त्र भांडार लक्ष्य झाल्यानं ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारत नाराज असल्याचे न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. द्वीपक्षीय पद्धतीनेच तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही असतो. ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्यानं हस्तक्षेप केल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची एकच भूमिका आहे असे ताशेरे न्यूयॉर्क टाईम्समधून ट्रम्प यांच्यावर ओढले जात आहेत.