Tuesday, November 18, 2025 09:54:23 PM

Fake Universities in India : 'यूजीसी'ने जाहीर केली देशातील 22 'बनावट विद्यापीठां'ची यादी; महाराष्ट्रातील विद्यापीठाचाही समावेश

मान्यता नसताना 'विद्यापीठ' हा शब्द वापरणे हा गुन्हा आहे. मात्र, यातील काही विद्यापीठे अनेक वर्षे सुरू आहेत. यूजीसीने वारंवार कारवाईचे निर्देश दिले असतानाही राज्य सरकारांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेय.

fake universities in india  यूजीसीने जाहीर केली देशातील 22 बनावट विद्यापीठांची यादी महाराष्ट्रातील विद्यापीठाचाही समावेश

Fake Universities in India : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी - UGC) देशातील मान्यता नसलेल्या आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या 22 विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. दरवर्षी या बनावट विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होते, हे लक्षात घेऊन यूजीसीने ही कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विद्यापीठांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देऊनही राज्य सरकारे त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे भविष्यात अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

बनावट विद्यापीठांचा आकडा आणि राज्यांमध्ये वितरण
यूजीसीच्या यादीनुसार, देशात सर्वाधिक 10 बनावट विद्यापीठे एकट्या दिल्लीमध्ये आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशमध्ये चार विद्यापीठे, आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठे, तर महाराष्ट्र आणि पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे. मागील पाच वर्षांत दिल्लीतील अशा विद्यापीठांची संख्या वाढली आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये घट दिसून आली आहे. यूजीसीने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती जाहीर करून विद्यार्थी व पालकांना प्रवेश घेण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा - MBBS Seats: मोठी बातमी! 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी देशभरात 10,650 नवीन MBBS जागांना मंजुरी

यूजीसीचे कायदे आणि सरकारचे दुर्लक्ष
यूजीसी कायदा, 1956 नुसार, केवळ केंद्र, राज्य किंवा प्रांतीय कायद्याने स्थापन झालेल्या संस्थांनाच कलम 22(1) नुसार 'विद्यापीठाची' (University) मान्यता मिळते. तसेच कलम 23 नुसार, मान्यता नसतानाही 'विद्यापीठ' या शब्दाचा वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, यातील काही विद्यापीठे मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असून, यूजीसीकडून वारंवार कारवाईचे निर्देश दिले जात असतानाही राज्य सरकारांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळेच या संस्था अजूनही पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करून बनावट पदव्या प्रदान करत आहेत.

विद्यार्थ्यांना आवाहन
यूजीसी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही यादी जाहीर करून पालकांना आणि विद्यार्थ्यांना मान्यता नसलेल्या संस्थांपासून सावध करते. या बनावट संस्थांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची विनंती यूजीसी राज्य सरकारांना सातत्याने करत आहे. त्यामुळे, विद्यार्थी व पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित विद्यापीठाला यूजीसीची अधिकृत मान्यता आहे की नाही, हे तपासूनच आपले भविष्य सुरक्षित करावे.

बनावट विद्यापीठांची नावे
दिल्ली
- आयपीपीएचएस विद्यापीठ
- कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड
- युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी
- वॉकेशनल युनिव्हर्सिटी
- ए.डी.आर.- सेन्ट्रिक जुरीडीकल विद्यापीठ
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग
- विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट
- आध्यात्मिक विश्वविद्यायल
- डब्ल्यूपीयूएन विद्यापीठ
- इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनीअरिंग

उत्तर प्रदेश
- गांधी हिंदी विद्यापीठ
- महामाया टेक्निकल विश्वविद्यालय
- नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ
- भारतीय शिक्षा परिषद

महाराष्ट्र
- राजा अरेबिक युनिव्हर्सिटी
- पश्चिम बंगाल
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसिन
- इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टनेटिव मेडिसिन अॅण्ड रिसर्च

केरळ
- सेंट जॉन युनिव्हर्सिटी
- इंटरनॅशनल इस्लामिक विद्यापीठ

पुद्दुचेरी
- श्री बोधि अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन

आंध्र प्रदेश
- क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी
- बाईबल ओपन युनिव्हर्सिटी

हेही वाचा - RRB NTPC Bharti 2025: स्टेशन मास्टर ते टीसीपर्यंत! भारतीय रेल्वेत 8800+ पदांसाठी मेगाभरती


सम्बन्धित सामग्री