UPSC CSE 2024 Final Result: यूपीएससीने 2024 च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. हा निकाल लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे ठरवण्यात आला आहे. मुलाखती जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात आल्या. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये बसलेले उमेदवार त्यांचा अंतिम निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहू शकतात. यूपीएससीने अधिकृत वेबसाइटवर शॉर्टलिस्ट स्वरूपात निकाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये UPSC CSE उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नावे आणि रोल नंबर दिले आहेत.
शक्ती दुबे यांनी पटकावले अव्वल स्थान -
1000 हून अधिक उमेदवारांनी यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत एकूण 1009 उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. आता त्यांना आयएएस, आयएफएस आणि आयपीएस इत्यादी सेवांमध्ये नोकऱ्या दिल्या जातील. 2024 च्या यूपीएससी परीक्षेत शक्ती दुबे यांनी ऑल इंडिया रँक 1 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. यासोबतच आयोगाने 230 उमेदवारांची राखीव यादी देखील तयार केली आहे.
हेही वाचा - 22 एप्रिल 'जागतिक वसुंधरा दिवस; जाणून घ्या महत्व आणि संपूर्ण इतिहास
टॉप 10 उमेदवारांची नावे
शक्ती दुबे
हर्षिता गोयल
डोंगरे अर्चित पराग
शाह मार्गी चिराग
आकाश गर्ग
कोमल पूनिया
आयुषी बन्सल
राज कृष्ण झा
आदित्य विक्रम अग्रवाल
मयंक त्रिपाठी
हेही वाचा - एलोन मस्कची आई माये मस्कसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
उमेदवार यूपीएससी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. यूपीएससी सिव्हिल परीक्षेसाठी नोंदणी आणि अर्ज करण्याची प्रक्रिया 14 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झाली. त्यानंतर 16 जून 2024 रोजी प्रिलिम्स परीक्षा घेण्यात आली. प्रिलिम्सचा निकाल 1 जुलै 2024 रोजी जाहीर झाला. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली, ज्याचा निकाल 9 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झाला.