Monday, March 09, 2026 08:02:57 AM

Crime News : काळजाचा थरकाप! एकाच कुटुंबातील 5 जणांच्या आयुष्याचा असा शेवट; भिंतीवरच्या 'त्या' मजकुराने पोलिसही चक्रावले

तीन चिमुकल्यांसह पती-पत्नींनी अशा पद्धतीने जगाचा कायमचा निरोप घेतल्यामुळे खप्परपूर गावात स्मशानशांतता पसरलेली आहे. नातेवाईकांनाही या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

crime news  काळजाचा थरकाप एकाच कुटुंबातील 5 जणांच्या आयुष्याचा असा शेवट भिंतीवरच्या त्या मजकुराने पोलिसही चक्रावले

Mathura Crime News : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील महावन पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खप्परपूर गावात मंगळवारी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. 35 वर्षीय शेतकरी मनीष कुमार, त्यांची पत्नी सीमा (32) आणि त्यांची तीन चिमुकली मुले हनी (5), प्रियांशी (4) आणि अवघ्या 2 वर्षांचा पंकज यांचे मृतदेह घरात आढळून आले. सकाळी उशिरापर्यंत मनीषच्या घरचा दरवाजा उघडला नाही आणि मुले खेळायला बाहेर आली नाहीत, तेव्हा संशय आल्यामुळे गावातील लोकांनी खिडकीतून वाकून आत पाहिले असता, समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

5 मृतदेह पाहून गाव हादरलं
तीन चिमुकल्यांसह पती-पत्नींनी अशा पद्धतीने जगाचा कायमचा निरोप घेतल्यामुळे खप्परपूर गावात स्मशानशांतता पसरलेली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरून गेला आहे. कर्जबाजारीपणा, घरगुती कलह की अन्य काही? या प्रश्नांचे जाळे अद्याप कायम असले, तरी पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांवरून ही सामूहिक आत्महत्या असल्याचे समजत आहे. त्यांच्या नातेवाईकांना या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

दूध आणि विषाचा संशय; पोलीस तपासात धक्कादायक वळण
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्लोक कुमार आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांना घरामध्ये दूधाचे रिकामे ग्लास सापडले असून, या दुधात विष कालवून कुटुंबाने जीवन संपवल्याचा प्राथमिक संशय आहे. मात्र, तपासात काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, मनीषने आधी आपल्या मुलांची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर पत्नीवर वार केले आणि सरतेशेवटी स्वतःला करंट लावून किंवा विष प्राशन करून संपवले असावे, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - Accident News: श्रीमंतीचा उन्माद! प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या लेकाचा रस्त्यावर कहर; भरधाव लॅम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडलं

भिंतीवरचा सुसाईड नोट आणि शेवटचा व्हिडिओ
या सामूहिक आत्महत्येच्या मागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, कारण घराच्या भिंतीवर मनीषने एक सुसाईड नोट लिहिली आहे. "मी, मनीष आणि सीमा आमच्या स्वतःच्या इच्छेने मृत्यू स्वीकारत आहोत, पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये," असा मजकूर भिंतीवर आढळला आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी मनीषने एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये त्याने या टोकाच्या पावलामागची कारणे सांगितल्याचे समजते. पोलिसांनी हा व्हिडिओ आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, त्यातून नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल.

फॉरेन्सिक अहवालाकडे सर्वांचे लक्ष
सर्व 5 मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण (विषबाधा की अन्य काही) हे पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच समोर येईल. पोलिसांनी मनीषचा फोन आणि लॅपटॉप जप्त केला असून त्याच्या कॉल रेकॉर्ड्सचीही तपासणी सुरू आहे. या घटनेने खप्परपुर गावावर शोककळा पसरली असून, एका शेतकऱ्याने आपल्या चिमुकल्यांसह असे पाऊल का उचलले, या प्रश्नाने मथुरा सुन्न झाली आहे.

हेही वाचा - Abdul Rahman killed: राम मंदिर उडवण्याचा कट रचणाऱ्या अब्दुल रहमानला तुरुंगातच संपवलं; जाणून घ्या घटनाक्रम


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या