जम्मू - काश्मीर: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, पुलवामाच्या त्राल भागात झालेल्या चकमकीमध्ये लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा अजूनही शोध सुरू आहे. त्राल येथे ठार झालेल्या एका दहशतवाद्याने चकमकीपूर्वी व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला होता. यादरम्यान, त्याने सैन्यांना आव्हान दिले होते की, 'सेना येऊ दे, मी बघतो', असं दहशतवादी आमिरने त्याच्या आईला सांगितले होते.
सध्या, दहशतवादी आमिर त्याच्या कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दहशतवादी आमिर त्याच्या आईसोबत बोलताना दिसत आहे. दहशतवाद्याची आई त्याला सैन्यांच्या शरण येण्यासाठी विनवण्या करत होती. मात्र, दहशतवादी आमिर म्हणाला की, 'सैन्याला पुढे येऊ दे मग मी बघतो'. सूत्रांनुसार, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते, पण त्यांनी शरण येण्याऐवजी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर दिले गेले आणि चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले.
हेही वाचा: खानमंडळींना लाज वाटत नाही? शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचे वक्तव्य
व्हिडिओ कॉलमध्ये काय म्हणाला आमिर?
व्हिडिओ कॉलमध्ये दहशतवादी आमिर म्हणतो, 'मी त्यांना सांगितले की पुढे या'. तेव्हा एक महिला विचारते, 'माझा भाऊ कुठे आहे?'. मग दहशतवादी आमिर म्हणतो, 'सेन्यांना पुढे येण्यास भीती वाटते'. त्यानंतर एक महिला म्हणते, 'काळजी करू नकोस, अल्लाह तुझी काळजी घेईल'. आमिरच्या आईने त्याला आत्मसमर्पण करण्याची विनंती केली, पण त्याने नकार दिला. त्यानंतर उमरची बहीण दहशतवादी आमिरसोबत बोलताना दिसते.
हेही वाचा: 68 वर्षीय आज्जीने उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा
दहशतवादी आमिरच्या हातात एके-47 रायफल:
ज्या घरातून सैन्यांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्याच घरातून दहशतवादी आमिर बोलत होता. व्हिडिओ कॉलवर बोलताना दहशतवादी आमिरच्या हातात एके-47 रायफल स्पष्टपणे दिसत आहे. सुरक्षा दलांना या लोकांनी आत्मसमर्पण करावे अशी इच्छा होती, पण त्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. म्हणून त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागले आणि चकमकीत दहशतवादी मारले गेले.