Saturday, February 14, 2026 01:05:21 PM

LPG-Aadhaar Link : गॅस सबसिडी हवीये? मग तातडीने करा आधार-LPG गॅस लिंक; अन्यथा होईल आर्थिक नुकसान, पाहा संपूर्ण प्रक्रिया

केंद्र सरकारने गॅस ग्राहकांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य केले असून, पारदर्शकता आणणे आणि बनावट कनेक्शन रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

lpg-aadhaar link  गॅस सबसिडी हवीये मग तातडीने करा आधार-lpg गॅस लिंक अन्यथा होईल आर्थिक नुकसान पाहा संपूर्ण प्रक्रिया

LPG-Aadhaar Link : तुम्ही अद्याप तुमचे एलपीजी गॅस कनेक्शन आधार कार्डशी लिंक केलेले नाही का? जर नसेल, तर तुम्हाला मिळणारी गॅस सबसिडी आणि इतर सरकारी योजनांचे लाभ बंद होऊ शकतात. केंद्र सरकारने गॅस ग्राहकांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य केले असून, पारदर्शकता आणणे आणि बनावट कनेक्शन रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हे महत्त्वाचे काम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी कसे पूर्ण करायचे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

या दोन अर्जांची (Forms) असेल गरज

तुमचे गॅस कनेक्शन आधारशी जोडण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने दोन फॉर्म भरावे लागतील:

फॉर्म 1: हे तुमचे बँक खाते आधारशी जोडण्यासाठी आहे (जेणेकरून सबसिडी थेट खात्यात येईल).
फॉर्म 2: हा अर्ज तुमचा आधार क्रमांक आणि गॅस ग्राहक आयडी (LPG ID) लिंक करण्यासाठी आहे.

ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया कशी करावी?

लक्षात ठेवा, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन नसून, तुम्हाला फॉर्म डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटचा वापर करावा लागेल:

- तुमच्या गॅस कंपनीच्या (इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- 'LPG Services' विभागात जाऊन 'Join DBTL' किंवा 'Download Forms' पर्यायावर क्लिक करा.
- फॉर्म 1 आणि फॉर्म 2 डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढा.
- फॉर्म 1 भरून आधार कार्डच्या प्रतीसह तुमच्या बँकेत किंवा वितरकाकडे जमा करा.
- फॉर्म 2 मध्ये तुमचा ग्राहक क्रमांक आणि आधार तपशील भरून तो गॅस एजन्सीच्या कार्यालयात द्या.

ऑफलाइन आणि पोस्टाद्वारे सोपी पद्धत

जर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म मिळत नसतील, तर तुम्ही खालील पर्याय निवडू शकता:

तुमच्या जवळच्या एलपीजी वितरक (Gas Agency) कार्यालयात जाऊन दोन्ही फॉर्म मिळवा, ते भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह तिथेच सबमिट करा. तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करून, ते भरून गॅस वितरकाच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे देखील पाठवू शकता.

हेही वाचा - Sensex Falls Reasons: शेअर बाजारात हाहाकार; गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी एका झटक्यात स्वाहा; 'या' कारणांनी मार्केट कोसळलं

लिंकिंग का महत्त्वाचे आहे?

आधार लिंक असल्यास सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. तुमच्या नावावर दुसरे कोणीही बनावट कनेक्शन घेऊ शकणार नाही. तसेच गॅस एजन्सीकडे तुमची ओळख सुरक्षितपणे प्रमाणित होते.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या