Sunday, June 15, 2025 12:36:08 PM

आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये सैनिकांची भेट घेतली. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार असा जोरदार घणाघात त्यांनी दहशतवाद्यांवर केला आहे.

आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरु केले होते. या मोहिमेच्या यशानंतर आज पहिल्यांदाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीर दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यावेळी त्यांनी श्रीनगरमध्ये सैनिकांची भेट घेतली. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार असा जोरदार घणाघात त्यांनी दहशतवाद्यांवर केला आहे. 

'ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कामगिरीवर देशाला अभिमान'
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांंनी श्रीनगरमध्ये सैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सैनिकांना संबोधित केले. सैनिकांच्या कामगिरीवर भारतीयांना गर्व असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कामगिरीवर देशाला अभिमान आहे. कुठेही लपून बसले तरी दहशतवाद्यांना सोडणार नाही अशी घणाघाती टीका मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. तसेच दहशतवाद्यांना किंमत मोजावी लागेल. पाकिस्ताननं नेहमी भारताला दगा दिला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही चकमक सुरूच; जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार

'आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार'
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावर आक्रमक पवित्रा घेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार अशी जोरदार टीका संरक्षणमंत्र्यांनी केली. न्यूक्लिअर बॉम्बची धमकी आता चालणार नाही. पाकिस्तानसोबत आता केवळ पीओकेवर चर्चा करणार आहे. भारतीय सैन्याचा निशाणा अचूक, हे जगाला माहिती आहे. वेळ पडल्यास कठोर पाऊल उचलणार असल्याचा आक्रमक पवित्रा देखील त्यांनी घेतला आहे. दहशतवाद्यांवर आता ऑपरेशन सिंदूरच औषध असल्याचेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.  

 


सम्बन्धित सामग्री