What is Family Pension: नोकरीनंतर निवृत्त झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी अनेक जण पेन्शनची व्यवस्था करतात. परंतु पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर ही रक्कम कोणाला मिळते? विशेषत: जर दोन पत्नी असतील तर कुटुंब पेन्शनचा हक्क कोणाला मिळतो? हे जाणून घेणं अनेकांसाठी महत्त्वाचं आहे.
कुटुंब पेन्शन म्हणजे काय?
कुटुंब पेन्शन ही अशी योजना आहे की, पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्याची पेन्शन त्याच्या पत्नी किंवा नामनिर्देशित कुटुंबीयाला दिली जाते. जर पतीचा मृत्यू 60 वर्षांनंतर झाला, तर पत्नीला पतीच्या पेन्शनच्या अर्धी रक्कम मिळते. पण जर मृत्यू 60 वर्षांपूर्वी झाला, तर पत्नीला पूर्ण पेन्शन मिळते.
पत्नी नसल्यास पेन्शन कोणाला मिळते?
जर पेन्शनधारकाच्या मृत्यूसमयी पत्नी जिवंत नसेल, तर ही पेन्शन मुलांना दिली जाते. मुलाचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर दोन किंवा अधिक मुले असतील, तर त्यांना समान वाटा मिळतो. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग मुलांना आयुष्यभर पेन्शनच्या 75 टक्के रकमेचा लाभ मिळतो.
हेही वाचा - RBI Silver Loan Rules: सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवता येते का? काय आहेत RBI चा नियम? जाणून घ्या
दोन पत्नी असल्यास कोणाला मिळते पेन्शन?
जर एखाद्या पेन्शनधारकाच्या दोन पत्नी असतील, तर पेन्शन कोणाला मिळेल? हा प्रश्न अनेकांना पडतो. सरकारी नियमांनुसार, फक्त कायदेशीररित्या वैध आणि नोंदणीकृत विवाह असलेली पत्नीच पेन्शनची पात्र ठरते. म्हणजेच, पहिल्या विवाहानंतर दुसरा विवाह कायदेशीर परवानगीशिवाय केला असल्यास, दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळणार नाही. याशिवाय, पेन्शन फक्त त्या व्यक्तीलाच मिळते जी पेन्शन फॉर्ममध्ये नामनिर्देशित (Nominee) आहे.
हेही वाचा - ATM Services: एटीएममधून पैसे काढण्याव्यतिरिक्त करता येतात 'ही' 7 महत्त्वाची कामे
कुटुंब पेन्शन ही योजना कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी असली, तरी ती फक्त कायदेशीर आणि नामनिर्देशित व्यक्तीलाच मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पेन्शन रेकॉर्डमध्ये योग्य नोंदी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.