Thursday, February 12, 2026 03:45:50 PM

Aadhaar App Full Version : कोणाचंही आधार कार्ड खरं की खोटं, आता एका क्लिकवर समजणार; आधार अ‍ॅपची पूर्ण आवृत्ती लाँच

या नवीन अपडेटमुळे अ‍ॅपचा पूर्णपणे कायापालट झाला असून, वापरकर्त्यांना आता अनेक प्रगत वैशिष्ट्ये वापरता येणार आहेत.

aadhaar app full version  कोणाचंही आधार कार्ड खरं की खोटं आता एका क्लिकवर समजणार आधार अ‍ॅपची पूर्ण आवृत्ती लाँच

Aadhaar App Full Version : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अखेर आधार अ‍ॅपची पूर्ण आवृत्ती (Full Version) अधिकृतपणे लाँच केली आहे. या नवीन अपडेटमुळे अ‍ॅपचा पूर्णपणे कायापालट झाला असून, वापरकर्त्यांना आता अनेक प्रगत वैशिष्ट्ये वापरता येणार आहेत. विशेष म्हणजे, 28 जानेवारीची तारीख जाहीर केलेली असतानाही हे अपडेट एक दिवस आधीच उपलब्ध झाले आहे.

आता तुम्हीच व्हा पडताळणी अधिकारी; 'QR कोड स्कॅनर'ची जादू
या नवीन आवृत्तीमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 'QR कोड स्कॅनर'. आतापर्यंत आपण फक्त स्वतःचा आधार डिजिटल स्वरूपात पाहू शकत होतो. मात्र, आता या स्कॅनरच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड खरे आहे की खोटे, हे तत्काळ पडताळू शकता. हॉटेल बुकिंग, भाडेकरू पडताळणी किंवा ओळख पटवण्याच्या ठिकाणी हे वैशिष्ट्य अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे आता आधारची प्रत्यक्ष (Physical) प्रत सोबत ठेवण्याची गरज उरणार नाही.

काही जुन्या सेवांमध्ये बदल आणि कपात
अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स जोडताना काही जुन्या सुविधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जुन्या अ‍ॅपमध्ये दिसणारे 'नाव' आणि 'ईमेल आयडी' अपडेट करण्याचे पर्याय सध्या नवीन आवृत्तीत दिसत नाहीत. सेवा विभागात सध्या फक्त 'मोबाईल नंबर' आणि 'पत्ता' अपडेट करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, UIDAI ने 28 जानेवारीची डेडलाईन निश्चित केली असल्याने, उद्यापर्यंत उर्वरित सेवा पुन्हा सक्रिय केल्या जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - YouTube Premium : YouTube वापरकर्त्यांना मोठा धक्का! आता 'या' फिचरसाठी मोजावे लागणार पैसे ?

दुसऱ्याचा आधार कसा पडताळायचा? (Step-by-Step)

- तुमच्या फोनवर नवीन Aadhaar App उघडा.
- होम पेजवर दिसणाऱ्या 'Scan QR Code' या पर्यायावर क्लिक करा.
- समोरच्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील QR कोड स्कॅन करा.
- स्कॅन होताच ते आधार वैध आहे की नाही, हे स्क्रीनवर दिसेल.
- अधिक माहितीसाठी तुम्ही 'View Details' वर क्लिक करून संबंधित व्यक्तीचे तपशील पाहू शकता.

नवीन अ‍ॅप मिळवण्यासाठी काय करावे?
ज्यांच्याकडे आधीच आधार अ‍ॅप आहे, त्यांनी Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊन अ‍ॅप अपडेट करणे आवश्यक आहे. नवीन वापरकर्त्यांनी अ‍ॅप स्टोअरवरून अ‍ॅप इंस्टॉल केल्यास त्यांना थेट 'अपडेटेड' आवृत्तीच मिळेल. हे अ‍ॅप वापरताना सुरक्षिततेसाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर जवळ असणे आवश्यक आहे. 
 


सम्बन्धित सामग्री