Monday, February 09, 2026 02:36:01 PM

Air India plane crash : अजित पवार विमान अपघाताची पुनरावृत्ती, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले; कुठे घडली दुर्घटना?

अजित पवारांच्या अपघाताची बातमी ताजी असताना अशातच आणखी मोठी समोर येत आहे. जयपूरमध्ये देखील अशीच एक घटना होता होता वाचली आहे.

air india plane crash  अजित पवार विमान अपघाताची पुनरावृत्ती माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले कुठे घडली दुर्घटना

अजित पवारांच्या अपघाताची बातमी ताजी असताना आणखी मोठी समोर येत आहे. जयपूरमध्ये देखील अशीच एक घटना होता होता वाचली आहे. जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या लॅंडिंगचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला मात्र दुसऱ्या प्रयत्नात हा अपघात होण्यापासून थोडक्यात बचावला. एअर इंडियाचं AI – 1719 हे विमान दिल्लीवरून जयपूरला निघाले होते जे दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर एअरपोर्टवर पोहोचलं. जयपूरला पोहचताच विमान लँडिंगचा प्रयत्न करत असताना हे विमान जस जसं धावपट्टीवर उतरलं तसं त्याच पहिलं लॅंडिंग अपयशी ठरलं. विमान जसं रन वेला टच झालं, त्यानंतर लगेचच पायलटने प्लेन ला गो-अराउंड केलं. तब्बल 10 मिनटं हवेत घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये आणि पायलटच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला. या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हे देखील प्रवास करत होते. यावेळी पायलटने केलेलं गो-अराउंड म्हणजे, विमान लॅंडिंग करत असताना जर धावपट्टीवरील खराब स्थिती किंवा काही तांत्रिक समस्येमुळे विमान लॅंडिंग करण्यास अडथळा निर्माण होत असेल, तर पायलट गो-अराउंड करतो. म्हणजेच विमान पुन्हा एकदा  हवेत उडवतो आणि त्यानंतर पुन्हा सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला जातो. 

हेही वाचा- Ajit Pawar Death : 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस..., अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर

अजित पवारांचा विमान अपघात कसा झाला? 
महाराष्ट्राचे वित्त मंत्री, बीड आणि पुण्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईतील कामं आटोपून आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीला निघाले होते. बारामती तालुक्यात आज त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या वेळी परिसरात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) काही प्रमाणात कमी होती. वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी न झाल्याने त्याने 'गो राऊंड' घेण्याचा निर्णय घेतला. 'गो राऊंड' म्हणजे धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वी पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरचक्र मारणे. दुर्दैवाने, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 19 वर येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला. त्यांच्या विमानाचा सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी स्फोट झाला. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
 


सम्बन्धित सामग्री