Tuesday, November 11, 2025 06:57:02 PM

MATRIZE-IANS Opinion Poll 2025: बिहारमध्ये कोणाची सत्ता? जनमत सर्वेक्षणात समोर आली संभाव्य धक्कादायक आकडेवारी

राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातचं आता आईएएनएस-मैटराइजच्या जनमत सर्वेक्षणात मोठा दावा करण्यात आला आहे.

matrize-ians opinion poll 2025 बिहारमध्ये कोणाची सत्ता जनमत सर्वेक्षणात समोर आली संभाव्य धक्कादायक आकडेवारी

MATRIZE-IANS Opinion Poll 2025: आज बिहार विधानसभा 2025 निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातचं आता आईएएनएस-मैटराइजच्या जनमत सर्वेक्षणात मोठा दावा करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार निवडणुकीत NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात निकालापासून ते मतदानाच्या टक्केवारीपर्यंत सर्व माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, MATRIZE-IANS च्या सर्वेक्षणानुसार एकूण 243 जागांपैकी एनडीएला 150-160 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया अलायन्सला 70-85 जागा मिळू शकतात. मतदान टक्केवारीच्या बाबतीत एनडीएला अंदाजे 49 टक्के आणि इंडिया अलायन्सला 36 टक्के मतदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

हेही वाचा - Election Update: 17 नगरपरिषदांवर महिला आरक्षण जाहीर, संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

संभाव्य मतदान टक्केवारी 

तथापी, सर्वेक्षणानुसार, NDA च्या गटातील घटकांमध्ये भाजपाला सर्वाधिक 21 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. तसेच जेडीयूला 18 टक्के, 'हम'ला 2 टक्के, लोक जनशक्ति पक्ष (रामविलास)ला 6 टक्के, आणि उपेंद्र कुशवाहाच्या आरएलएमला 2 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे एनडीएच्या खात्यात एकूण 49 टक्के मतदान येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Bypolls Elections 2025 : 'या' राज्यांमध्ये पोटनिवडणूक जाहीर; जाणून घ्या मतदान आणि निकालाची तारीख

पक्षानुसार संभाव्य जागा - 

सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्ष (भाजपा) ला अंदाजे 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे. जनता दल (युनायटेड) JDU ला 60 ते 65 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) ला 4 ते 6 जागा, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) ला 3 ते 6 जागा आणि राष्ट्रीय लोक जनतांत्रिक मंच (RLM) ला 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे बिहारमधील पहिले जनमत सर्वेक्षण आहे, जे निवडणुकीपूर्वी पक्षांच्या अपेक्षित कामगिरीवर प्रकाश टाकतात. 


सम्बन्धित सामग्री