Saturday, June 14, 2025 04:07:28 AM

कणखर कोण, इंदिरा गांधी की नरेंद्र मोदी?

निर्णय क्षमतेच्या मुद्द्यावरून एकीकडे इंदिरा गांधी यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न कितपत तर्कसंगत आहे.

कणखर कोण इंदिरा गांधी की नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने एकीकडे भारतीय जनतेचा ऊर आनंद आणि अभिमानाने भरून गेला असताना मोदी विरोधकांनी इंदिरा गांधींच्या कौतुकाचे पिल्लू सोडले आहे. या निमित्ताने 1971च्या भारत - पाकिस्तान युद्धाच्या आणि बांगलादेश निर्मितीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. निर्णय क्षमतेच्या मुद्द्यावरून एकीकडे इंदिरा गांधी यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न कितपत तर्कसंगत आहे. काळाच्या कसोटीवर नेतृत्वाचा कस त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आणि निर्णयाच्या परिणामामुळे लागतो. त्याचवर ठरते की, कणखर नेता कोण आहे? 

भारताचे इंग्रजांनी दोन तुकडे केल्याने पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान निर्माण झाला. एकाच देशाचे दोन भूभाग अशा प्रकारे एकमेकांपासून इतक्या दूर असण्याचे दुसरे उदाहरण जगात नसेल. भारताविरोधात कारवायांसाठी आणि पूर्व पाकिस्तानातील जनतेला छळण्यासाठी पश्चिम पाकिस्तानातील नेतृत्वाने अन्यायाची मालिका सुरु केली. या अन्यायाला कंटाळून पूर्व पाकिस्तानात एकीकडे मुक्तिवाहिनीचा संघर्ष उभा राहिला. तर दुसरीकडे निर्वासितांचे अनेक लोंढे भारतावर आदळू लागले. त्रिपुरा राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जायची वेळ आली आणि भारताला स्वसंरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी मुक्तिवाहिनी संघर्षाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे पाकिस्तानची शकले पडली. बांगलादेशचा जन्म झाला. याच कारणाने इंदिरा गांधी यांना काँग्रेसी पोलादी महिला म्हणतात. 

हेही वाचा : राज्य सरकारचा ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार; महाराष्ट्रात 5,127 कोटींची परकीय गुंतवणूक

काँग्रेसकडून नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांच्यात तुलना करण्यासाठी नोंदवले जाणारे आक्षेप कोणते?
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे केले. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे तुकडे करता आलेले नाहीत. इंदिरा गांधी अमेरिकेसमोर झुकल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दबाव सहन केला. नेमक्या याच मुद्द्यावर काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना घेरण्यास सुरुवात केली. मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली ऑपरेशन सिंदूर थांबवले असा प्रचार काँग्रेस आघाडीकडून देशात सुरु झाला. 

नरेंद्र मोदी यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. पहलगाम हल्ल्यात 26 निरपराध मारले गेले. पहलगामचे हल्लेखोर अनेक दिवस फरार होते. प्रत्त्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूर सुरु झालं. निर्णायक चढाई होतानाच लष्करी कारवाई थांबली. कारवाई थांबण्याआधी अमेरिकेने श्रेय घेतले. एकीकडे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेची भलामण काँग्रेसी करत असताना 1971च्या घोडचुकासुद्धा विसरता येणार नाहीत. इंदिरा सरकारची तात्काळ लष्करी कारवाईची तयारी का नव्हती? भारतीय सैन्याकडे 1971मध्ये साधनसामग्रीचा अभाव का होता?पाकिस्तानच्या शरणागत सैन्याला इंदिरा सरकारने का सोडून दिले? शरणागत सैन्याला सोडण्यासाठी इंदिरा सरकारवर कुणाचा दबाव होता? बांगलादेश निर्मितीचे श्रेय इंदिरा गांधींचे की फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांचे ? काँग्रेसचा हा दावा मोदी समर्थकांनी लगोलग फेटाळून लावला आहे. 


सम्बन्धित सामग्री