Friday, April 25, 2025 09:34:25 PM

भारतीयांना दुबईतून सोने खरेदी केल्यावर सीमाशुल्क (Custom Duty) का द्यावा लागतो?

भारतीयांना दुबईतून सोने खरेदी केल्यावर सीमाशुल्क custom duty का द्यावा लागतो

सध्या लग्नाचा सीझन सुरु असल्यामुळे अनेकजण सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दुकानात गर्दी करतात. मात्र 2025 मध्ये, भारतातील सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोन्याचा दर 80 हजारांहून अधिक आहे. एकीकडे, भारतात सोन्याचे दर वाढत आहे तर दुसरीकडे, दुबईमध्ये सोन्याचे दर कमी आहे. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करण्यासाठी दुबईला जाण्याचा विचार करत आहेत. कारण, दुबईमध्ये सोने ही उत्तम दर्जाची असते आणि त्यासोबतच येथील सोन्याचे दर कमी असते. याच कारणामुळे, जगभरातून पर्यटक खास सोने खरेदी करण्यासाठी दुबईमध्ये मोठ्या संख्येने येतात. 
                       मात्र, जेव्हा तुम्ही दुबईमध्ये सोने खरेदी करून भारतात येतात, तेव्हा तुम्हाला दुबईतून सोने खरेदी केल्यामुळे सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी (Custom Duty) द्यावा लागतो. पण, तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे दुबईतून सोने खरेदी केल्यानंतर तुम्हाला सीमाशुल्क का द्यावा लागतो? चला तर जाणून घेऊया. 


दुबईतील सोने स्वस्त कारण... 


1 - दुबईतील करमुक्त व्यापार आणि कर सवलती:

करमुक्त (Tax-Free) खरेदी आणि आयात शुल्क नसल्यामुळे दुबईमध्ये सोन्याचे दर कमी असते. या कारणामुळे भारताच्या तुलनेने दुबईमध्ये सोने स्वस्त किमतीत मिळतात. 
 

2 - आयात शुल्क नाही:

भारतात, सोन्यावर आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी (Import Duty) द्यावा लागतो. मात्र, दुबईमध्ये तुम्हाला आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी (Import Duty) नाही द्यावे लागते. या कारणामुळे दुबईमध्ये सोन्याचे दर कमी आहे. 


3 - दुबईतील सोन्याचे व्यवहार:

दुबईमध्ये सोन्याचे व्यवहार यूएस डॉलर (USD) आणि संयुक्त अरब अमिराती दिरहम (AED) मध्ये होतात. जे भारतीय रुपयाच्या (INR) तुलनेत स्थिर आणि मजबूत चलने आहेत. इतकेच नाही, तर डॉलरच्या किमतीनुसार सोन्याचा दर ठरत असतो. यामुळे भारतीय रुपयाच्या तुलनेने पाहिलं तर दुबईमध्ये सोन्याचे दर कमी राहते. 

 4 - दुबईमध्ये व्यवसायिक खर्च कमी:

दुबईमध्ये व्यवसायिक खर्च कमी असल्याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याच्या दागिन्यांवर कामगार खर्च कमी असणे. त्यासोबतच, इतर देशांच्या तुलनेने दुबईतील भाडे, उत्पादन खर्च आणि इतर व्यवसायिक खर्च कमी असते. यामुळे, भारताच्या तुलनेत दुबईमध्ये दागिन्यांचे एकूण दर कमी असते. 

'या' कारणामुळे भारतात आल्यावर द्यावी लागते कस्टम ड्युटी:


1 - काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी:

काळा पैसा (Black Money) रोखण्यासाठी आणि त्यासोबतच तस्करी (Smuggling) रोखण्यासाठी सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी (Custom Duty) आकारले जातात. 

2 - भारतात सोन्याच्या व्यापारांचे संरक्षण करण्यासाठी:

भारतामध्ये अनेक सराफ, ज्वेलर्स आणि लघुउद्योग (स्टार्टअप) मोठ्या प्रमाणात सोन्याच्या व्यवसायावर अवलंबून असतात. सोन्याच्या वाढत्या दरामुळे, जर सर्वजण परदेशातून कमी किमतीत सोने खरेदी करू लागले तर अनेक सराफांचे, ज्वेलर्स आणि लघुउद्योगांचे (स्टार्टअप) मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. यामुळे, सरकारने त्यांचे व्यवसाय वाचवण्यासाठी सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी (Custom Duty) लागू केले आहे.

3 - भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम:

परदेशातून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यास त्याचे वाईट परिणाम भारताच्या व्यापार तुटीवर (Trade Deficit) होऊ शकतो. जर आयात (Import) जास्त असेल आणि निर्यात (Export) कमी असेल, तर भारताच्या चलनावर (INR) आणि अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे भारतात आल्यावर पर्यटकांना कस्टम ड्युटी द्यावी लागते. 

4 - भारत सरकारचे महसूल धोरण:

भारत सरकारला सोन्याच्या आयातीवर (Import) उच्च कर लावून महसूल (Revenue) मिळवायचा असतो. याचे मुख्य कारण म्हणजे भारत हा जगातील सर्वाधिक सोने खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे, जर सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी (Custom Duty) आकारलेच नाही, तर लोक परदेशातून मोठ्या प्रमाणात स्वस्त सोने आणतील आणि सरकारला महसूल (Revenue) मिळणार नाही.


सम्बन्धित सामग्री