Woman Dies Due to Rabies: ग्रेटर नोएडाच्या जेवर भागातील थोरा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 40 वर्षीय महिलेचा रेबीजमुळे मृत्यू झाला. या महिलेने पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेल्या गायीचे दूध प्यायले होते, त्यानंतर तिची तब्येत बिघडू लागली. तपासणीनंतर गायीला रेबीजची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले. परंतु, सीमा नावाच्या महिलेला लसीकरण करण्यात आले नाही.
40 वर्षीय महिलेला रेबीजची लागण -
मिळालेल्या माहितीनुसार, मृत 40 वर्षीय सीमा तिच्या कुटुंबासह थोरा गावात राहत होती. एका गायीने एका वासराला जन्म दिला होता. या गाईला कुत्रा चावला होता. सीमाने या गाईचे दूध प्यायले होते. काही दिवसांनी गायीमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर तपासणीत गायीला रेबीजची पुष्टी झाली.
महिलेचा रेबीजमुळे मृत्यू -
सोमवारी, सीमाने प्रकाशाची भीती आणि उलट्या होत असल्याची तक्रार केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. पण अनेक रुग्णालयांनी त्याला दाखल करण्यास नकार दिला. शेवटी तिला दिल्लीच्या बसंत कुंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला रेबीज झाल्याचे सांगितले आणि घरी पाठवले. तथापि, गुरुवारी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावातील आणि परिसरातील लोकांमध्ये भटक्या कुत्र्यांची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - चेहऱ्यावर 'मुस्कान' अन् मनात सैतान! सौरभला मारण्यापूर्वी त्याच्यासोबत शेवटचा डान्स; जाणवू पण दिलं नाही.. VIDEO Viral
गावात भटक्या कुत्र्यांची दहशत -
जेवर येथील रहिवासी त्रिलोक यांनी सांगितले की, जेवर परिसरात भटक्या कुत्र्यांचा दहशत सतत वाढत आहे. केवळ थोरा गावातच नाही तर आजूबाजूच्या गावांमध्येही कुत्रा चावण्याच्या घटना दररोज घडत आहेत, ज्यामुळे अनेक लोक जखमी होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही रेबीज इंजेक्शन्स उपलब्ध नसल्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - सौरभने पत्नी आणि मुलीसाठी ‘कोफ्ते’ आणले; पण मुस्कानला जराही किंमत नव्हती! बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीचे केले 15 तुकडे
रेबीज पासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी -
रेबीजपासून वाचण्यासाठी लसीकरण करणे आणि तुमच्या पाळीव प्राण्यांना (कुत्रे, मांजरी इ.) रेबीज विरूद्ध लसीकरण करणे सर्वात महत्वाचे आहे. याशिवाय, जर तुम्ही अशा भागात प्रवास करण्याचा विचार करत असाल जिथे रेबीजचा धोका आहे, तर प्रवासापूर्वी रेबीजची लस घ्या. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही रेबीजच्या संपर्कात आला आहात, तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या आणि रेबीज लसीकरण करा. अनेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, उकळलेले गाईचे दूध पिल्याने रेबीज होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. परंतु, तरी रेबीज झालेल्या गायी किंवा म्हशीचे दुध पिणे टाळा.
Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.