Friday, March 13, 2026 07:44:22 AM

Women's T20 World Cup 2026 Schedule: महिला टी-20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना

आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे लागले आहे.

womens t20 world cup 2026 schedule महिला टी-20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर या दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना

ICC Women's T20 World Cup 2026: महिला क्रिकेटमधील सर्वात मोठ्या महाकुंभाचे बिगुल वाजले आहे. आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे लागले आहे. ही स्पर्धा यावर्षी 12 जून ते 5 जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी होणार असून, जेतेपदासाठी त्यांच्यात चुरस पाहायला मिळेल.

भारत आणि पाकिस्तान 'ग्रुप ऑफ डेथ' मध्ये
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा समावेश गट 1 मध्ये करण्यात आला आहे. या गटात त्यांच्यासोबत बलाढ्य ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे संघ आहेत. ऑस्ट्रेलियाने सहा वेळा हे जेतेपद पटकावल्यामुळे या गटाला "ग्रुप ऑफ डेथ" मानले जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 14 जून रोजी एजबॅस्टन येथे खेळवला जाईल. दोन्ही देशांमधील ही लढत केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि नॉकआउट सामने
स्पर्धेचा थरार 13 जूनपासून सुरू होईल, तर अंतिम सामना 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. या स्पर्धेत इंग्लंड-स्कॉटलंड ही लढत देखील महत्त्वाची ठरणार आहे, कारण इंग्लंडच्या भूमीवर हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. 30 जून आणि 2 जुलै रोजी उपांत्य फेरीचे सामने होतील आणि त्यानंतर विश्वविजेता ठरेल.

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक (IST) 
  
13 जून 2026 - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - रात्री 11:00
13 जून 2026- स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड- दुपारी 3:00
13 जून 2026 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सायंकाळी 7:00
14 जून 2026, भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन), सायंकाळी 7:00
17 जून 2026, भारत विरुद्ध नेदरलँड्स, सायंकाळी 7:00
21 जून 2026, दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, सायंकाळी 7:00
24 जून 2026, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, रात्री 11:00
25 जून 2026, भारत विरुद्ध बांगलादेश, सायंकाळी 7:00
28 जून 2026, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सायंकाळी 7:00

नॉकआउट सामने:
उपांत्य फेरी 1: 30 जून 2026 (सायंकाळी 7:00)
उपांत्य फेरी 2: 2 जुलै 2026 (रात्री 11:00)
अंतिम सामना: 5 जुलै 2026 (सायंकाळी 7:00)


सम्बन्धित सामग्री