Crime News : 'आई' शब्दाला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या विवाहबाह्य संबंधांची वाच्यता होऊ नये, म्हणून एका मातेने चक्क आपल्या 3 वर्षांच्या चिमुरड्याचा बळी घेतला. मात्र, या हत्येनंतर तो निष्पाप मुलगा दररोज आईच्या स्वप्नात येऊन तिला जाब विचारू लागला. अखेर मुलाच्या आत्म्याच्या भयापोटी या मातेने स्वतःच पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या कृत्याची कबुली दिली.
गच्चीवरचा तो आक्षेपार्ह प्रसंग आणि मुलाचा अंत
ही घटना ग्वाल्हेरच्या थातीपूर पोलीस ठाणे परिसरात घडली. 28 एप्रिल 2023 रोजी आरोपी महिला ज्योती राठोड आपल्या प्रियकरासोबत घराच्या गच्चीवर होती. त्याच वेळी तिचा 3 वर्षांचा मुलगा सनी उर्फ जतिन तिथे पोहोचला. चिमुरड्याने आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे गुपित कोणाला कळू नये, या भीतीने ज्योतीने आपल्या काळजाच्या तुकड्याला दोन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकून दिले.
अपघाताचा बनाव अन् वडिलांचा विश्वास
उंचावरून पडल्याने सनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सनीचे वडील पोलीस कॉन्स्टेबल असल्याने त्यांनी सुरुवातीला याकडे अपघात म्हणून पाहिले. मुलाच्या दु:खामुळे पत्नी ज्योतीची प्रकृती खालावली असावी, असा त्यांचा समज होता. मात्र, ज्योतीला पडणारी स्वप्ने तिच्या मनातल्या पापाची साक्ष देत होती.
हेही वाचा - Traffic E-Challan Scam: मुंबईकरांनो सावधान! मोठा स्कॅम, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनच्या एका शोधामुळे घोटाळा समोर
मुलाच्या मृत्यूनंतर ज्योतीला शांत झोप लागेनाशी झाली. ती रात्री अचानक ओरडत उठून बसायची. तिला सतत आपला मुलगा स्वप्नात दिसायचा आणि तिला घाबरवायचा. मुलाचा आत्मा भटकत असून तो आपल्याला सोडणार नाही, या भीतीने ती मानसिकरीत्या खचली. डॉक्टरांचे उपचारही तिला आराम देऊ शकले नाहीत. अखेर या मानसिक छळाला कंटाळून तिने पतीला सत्य सांगितले आणि पोलिसांकडे धाव घेतली.
हेही वाचा - Beggar Wealth: भीक मागून लाखोंची कमाई? एका भिकाऱ्याकडे तीन घरे, रिक्षा आणि आलिशान कार; सत्य समजताच पोलीसही चक्रावले
न्यायालयाचा निकाल
ज्योतीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला. मात्र, या प्रकरणात पुरावे अपुरे पडल्याने न्यायालयाने तिच्या प्रियकराची निर्दोष मुक्तता केली. पण स्वतःच्या मुलाचा जीव घेणाऱ्या या मातेच्या मनात मात्र तो 3 वर्षांचा सनी कायमची दहशत निर्माण करून गेला.