Fri. Jun 18th, 2021

मोठा खुलासा : जैशच्या चार इमारती उद्ध्वस्त केल्याचे गुप्तचर यंत्रणेकडे पुरावे

भारतीय वायू दलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधील दहशतवादी तळे एअर स्ट्राईक करून उद्धवस्त केली होती.

या हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा गुप्तचर यंत्रनाकडून करण्यात आला आहे.

सुत्राच्या माहीतीनुसार एअर स्ट्राईकने करण्यात आलेल्या हल्ल्यात जैशच्या चार इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

याबाबत गुप्तचर यंत्रणेकडे सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) वरून घेतलेले फोटो पुरावा म्हणून आहेत.

दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचे पुरावे

26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

एअर स्ट्राईकने करण्यात आलेल्या हल्ल्यात जैशच्या चार इमारती उद्ध्वस्त झाल्या असल्याची माहिती आहे.

या कारवाई संबधीत पुरावे गुप्तचर यंत्रनाकडे असल्याचा मोठा खुलासा करण्यात आला आहे.

यावेळी सिथेंटिक अपर्चर रडारच्या (SAR) सहाय्याने घेण्यात आलेले फोटो पुरावा म्हणून उपलब्ध आहेत.

मिराज २००० ने पाच S-२००० प्रिसिजन गायडेड म्युनिशन (PGM) च्या मदतीने चार इमारतीना उद्धवस्त केल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

इमारतीचा या कामांसाठी वापर

हल्ला केला त्या ठिकाणी चार इमारती होत्या.

त्यातली एक इमारत गेस्ट हाऊस सारखी वापरली जात होती.

दुसऱ्या एल आकाराच्या इमारतीमध्ये प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहत होते.

एक दोन मजल्याची इमारत होती. त्यातही प्रशिक्षण घेणारे राहत होते.

तर एका इमारतीत कॉम्बॅट ट्रेनिंगच्या शेवटच्या टप्प्यात असणारे राहत होते.

एअर स्ट्राईकने या सर्व इमारती उध्दवस्त केल्या आहेत.

इस्त्राइल बनावटीच्या बॉम्बचा वापर या हल्ल्यात  केला.

हे बॉम्ब इमारतीच्या आतमध्ये घुसून संपुर्ण इमारत उद्धवस्त करतात.

मंगळवारी ढग दाटल्यामुळे सॅटेलाइच्या सहाय्याने फोटो घेता आले नाही.

त्यामुळे SAR च्या साह्याने फोटो घ्यावे लागल्याने ते स्पष्ट आले नाहीत आशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *