Thu. Oct 1st, 2020

आठ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल          

आठ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलामध्ये दाखल झाले आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस.धनोआ यांची उपस्थिती होती.

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात वाढ झाली आहे. आठ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलामध्ये दाखल झाले आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस.धनोआ यांची उपस्थिती होती. पंजाबच्या पठाणकोट या हवाईतळावर आठ ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश झाला. त्यामुळे  सैन्याच्या लढाऊ क्षमता वाढणार हे निश्चित आहे .

280 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारं

अतिवेगवान हेलिकॉप्टर असल्यामुळे व वेगळ्या रचनेमुळे रडार सहजपणे त्याला पकडु शकणार नाही. भारत सरकारने अमेरिकेच्या शबोइंग यांच्याकडून 4168 कोटी रुपयात २२ अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता.

पुढील वर्षापर्यंत भारताला सर्व 22 अपाचे हेलिकॉप्टर मिळतील. पावणे तीन तासांपर्यत हवेत राहू शकणाऱ्या या हेलिकॉफ्टरने दशवतवाद्यांच तळ असो किंवा लढाऊ टॅंक सर्व उद्ध्वस्त करता येणं शक्य आहे.

अपाचे एएच -64 ई हे जगातील सर्वात प्रगत मल्टी-रोल लढाऊ हेलिकॉप्टर आहे. इराकमध्ये झालेल्या आखाती युध्दामध्ये या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती.

‘अपाचे’ हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

सुमारे ताशी 280 किमी वेगाने उड्डाण क्षमता
अतिवेगवान हेलिकॉप्टर असल्यामुळे आणि वेगळ्या रचनेमुळे रडारवर सहज पकडलं जात नाही
इंधन भरल्यानंतर साडेतीन तास उड्डाण
8 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलात सामील होणार
अपाचे एएच -64 ई – जगातील सर्वात प्रगत मल्टी-रोल लढाऊ हेलिकॉप्टर
इराकमध्ये झालेल्या आखाती युध्दामध्ये या हेलिकॉप्टरचा वापर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *