Mon. Jul 22nd, 2019

भारतीय वायुसेनेचे ‘जॅग्वार’ कोसळले; पायलट सुरक्षित  

21Shares

भारतीय वायुसेनेचे जॅग्वार हे लढाऊ विमान उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये कोसळले आहे.

या विमानाने सकाळच्या सुमारास दैनंदिन सरावासाठी गोरखपूर येथून उड्डाण घेतले होते, अशी अधिकृत माहिती भारतीय वायुसेनेकडून देण्यात आली आहे.

कुशीनगरमधील हेतिमपूर गावातील शेतात हे विमान कोसळल्याची माहिती आहे. तसेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

सुदैवाने, या दुर्घटनेतून वैमानिक थोडक्यात बचावला आहे. योग्यवेळी पॅराशुटच्या सहाय्याने वैमानिकाने उडी घेतली यामुळे वैमानिक सुखरुप आहे.

मात्र हे विमान का कोसळलं याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

21Shares

Leave a Reply

%d bloggers like this: