Wed. Dec 1st, 2021

भारतीय वायूदलाचे मिग २१ विमान झाले क्रॅश

पंजाब: पंजाबमधील मोगा येथे भारतीय वायू दलाचे मिग २१ हे लढाऊ विमान मध्यरात्री उशिरा कोसळून अपघात झाला. नियमित प्रशिक्षणासाठी या विमानाने उड्डाण घेतले होते, त्याचवेळी विमानाला अपघात झाल्याची माहिती, वायू दलाकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरुन या विमानाने उड्डाण घेतलं होतं. पायलट अभिनव चौधरी यांनी सूरतगढवरुन जगरावच्या इनायतपुरा एअरबेससाठी उड्डाण घेतलं होतं. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास या विमानाचा अपघात झाला.

मोगापासून २५ किमी अंतरावरील लंगियाना खुर्द या गावाजवळ ही दुर्घटना घडली. वातावरण खराब असल्याने बचाव पथक रात्री ११.०० वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रशिक्षणासाठी हे विमान उडविण्यात आले होते.

गावातील नागरिकांना रात्री ९.३० च्या सुमारास मोठा आवाज आला. त्यामुळे, घाबरलेल्या ग्रामस्थांनी माहिती घेतली. त्यावेळी ही विमान दुर्घटना असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *